मुंबई : बॉलिवूड (Bollywood)क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर (Anupam Kher)यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सतीश कौशिकसोबतचा एक फोटो शेअर करुन लिहिलंय की, मला माहित आहे, मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे!
अनुपम खेर यांनी ट्विट करून आपला सर्वात खास मित्र गमावल्याचं दुःख व्यक्त केलं आहे. सतीश कौशिकसोबतचा फोटो शेअर करत आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, मला माहित आहे मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे! पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असे लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम!! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही! ओम शांती!
World Women’s Day च्या दिवशी यशोमती ठाकूरांना विधानसभेत अश्रू अनावर!
सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या मित्राच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील त्यांच्या घरी नेलं जाणार आहे. त्यानंतर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.
सतीश कौशिक हे गुरगाव येथे कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्महाऊसवरून परत जाताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुरगावमधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आलं होतं त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
सतीश कौशिक यांनी प्रतिष्ठित नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतलं होतं. अभिनेता असण्यासोबतच सतीश कौशिक हे दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि विनोदी कलाकार देखील होते. कॉमेडीचा विषय आला की सतीश कौशिक पडद्यावरची संपूर्ण लाईमलाईट लुटायचे. सतीश कौशिक यांनी अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले होते.
त्यांच्या हिट चित्रपटांमध्ये प्रेम, रूप की रानी चोरों का राजा, ढोल, क्यूंकी, कागज, मासूम, मिस्टर इंडिया, जलवा, राम लखन, जमाई राजा, आंटी नंबर 1, जाने भी दो यारों, उडता पंजाब, मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.
आणीबाणी हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. तेरे नाम आणि मुझे कुछ कहना है या चित्रपटांचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. त्याचं दिग्दर्शन कंगना राणौतनं केलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सतीश कौशिक यांनी टीव्ही इंडस्ट्रीतही मोठं नाव कमावलं होतं.