Download App

Nitin Desai Suicide: दोन दिवस स्टुडिओतच मुक्काम, घरच्यांशी संपर्क तोडला; अखेरच्या तासांमध्ये नितीन देसाईंसोबत काय घडलं?

Nitin Desai Suicide: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आपली शिवण यात्रा संपवली आहे. हिंदी आणि मराठी सिनेमासह अनेक कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

Gashmir Mahajani: चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर थेटच म्हणाला, “मी माझ्या…”

त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं?

कर्जत येथील एनडी स्टुडिओच्या एन्ट्रीला नितीन देसाई यांनी स्वतःसाठी एक घर बांधले आहे. गेल्या २ दिवसांपासून नितीन देसाई हे तिथेच राहत असल्याचे पाहायला मिळत होते. घरातील काही सदस्य देसाईंना फोन करत होते. परंतु ते कोणताही प्रतिसाद देत नव्हते, म्हणून त्यांनी एनडी स्टुडिओमधील कार्यालयात कॉल करण्यात आला. त्यावेळेस स्टुडिओमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराजवळ जाऊन बघितले. परंतु घरातून कोणताही आवाज येत नसल्यचे पाहायला मिळाले. आवाज येत नसल्याने अखेर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी एनडी स्टुडिओच्या काही स्टुडिओमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नितीन देसाई एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नंतर या घटनेविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांची टीम, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. नितीन देसाईंनी आत्महत्या का केली, याचे कारण देखील अंदाजे लावले जात आहे. एवढं टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत अखेरच्या क्षणी त्यांच्या डोक्यात नेमका कोणता विचार सुरु होता. याची चर्चा सध्या रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nitin Desai: अडीचशे कोटींच्या कर्जाचा डोंगर अन् स्टुडिओ जप्तीची भीती? नितीन देसाई होते आर्थिक विवंचनेत

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे सन २००० मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ आणि २०२३ मध्ये ‘देवदास’साठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य सिनेमा पुरस्कार’ देखील त्यांना देण्यात आला होता. ते प्रोडक्शन डिझायनर म्हणून ‘लगान’, जोधा-अकबर, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’,  प्रेम रतन धन पायोया यासारख्या सिनेमाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.

तसेच त्यांनी कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशात नाव कमावले. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी अनेक वेळा सेट उभारले आहेत. नितीन देसाईंचा मुलगा अमेरिकेमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीच एनडी स्टुडिओत नितीन देसाईंच्या लेकीचा भव्य लग्न सोहळा पार पडल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Tags

follow us