Nitin Desai: अडीचशे कोटींच्या कर्जाचा डोंगर अन् स्टुडिओ जप्तीची भीती? नितीन देसाई होते आर्थिक विवंचनेत
Nitin Chandrakant Desai death: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी (Nitin Chandrakant Desai) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे.
#WATCH | Maharashtra MLA Mahesh Baldi confirms the death of 'Lagaan' art director Nitin Desai, says, "He was under financial stress and this could be the only reason for suicide."
"We have found the body of art director Nitin Desai hanging in his studio in Karjat. Police were… pic.twitter.com/RIl0vjgOc5
— ANI (@ANI) August 2, 2023
आत्महत्येमागील नेमकं कारण काय?
आज सकाळी ४ वाजता कला कलादिग्दर्शक यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत होते अशी माहिती मिळत आहे. ‘स्टुडिओ हा फ्लिम वर चालतो. मात्र, स्टुडिओ चालत नसल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बातचीत झाली होती. तेव्हा देखील त्यांनी आर्थिक विवंचना सुरू आहे अशी अपक्ष आमदार महेश बालदी यांनी माहिती दिली.
तसेच त्यांच्यावर एकूण २४९ कोटींचे कर्ज होते. त्यामुळे संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला होता. परंतु देसाई यांच्याकडून कर्जाची रक्कम भरली गेली नाही. कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखलकरण्यात आला होता. परंतु त्याला आता सुमारे २ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्या हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.
सिनेमासृष्टीत प्रवेश करण्याअगोदर नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची सिनेमा कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या सिनेमामुळे ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या सिनेमांचं त्यांनी कला दिग्दर्शन केले होते.
२० वर्षांच्या या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांनी ४ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार मिळवला आहे, तर ३ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.