Download App

‘अपना सपना मनी-मनी’चे लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन कालवश, 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Director Sangeeth Sivan: अभिनेता रितेश देशमुखने 'क्या कूल है हम' चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

Director Sangeeth Sivan Passed Away: मनोरंजविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक संगीत सिवन ( Sangeeth Sivan) यांचे निधन झाले आहे. ते 61 वर्षांचे होते. मात्र त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर स्पष्ट झालेलं नाही. (Director Sangeeth Sivan Dies) ‘अपना सपना मनी-मणी’, ‘जोर’, ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘यमला पगला दीवाना-2’ यांसारख्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. शिवाय त्यांनी मोहनलाल यांच्यासोबत तीन चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले. आणि हे तीनही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले.

 

तसेच रितेश देशमुखच्या ‘अपना सपना मनी मनी’ या सिनेमाचे दिग्दर्शनही संगीत सिवन यांनी केले होते. आता संगीत सिवन यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांनी वयाच्या 61व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. संगीत सिवन यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आली नाही. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. संगीत सिवन हे 61 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर अभिनेता रितेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.


काय आहे रितेशची पोस्ट?

अभिनेत्याने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने संगीत सिवन यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने ‘संगीत सिवन यांचे निधन झाले हे ऐकून मला अतिशय दु:ख होत आहे आणि मोठा धक्का बसला आहे. एक नवखा अभिनेता असल्यावर त्याच्यावर कोणीतरी विश्वास ठेवावा असे सर्वांना वाटत असते. तसेच कोणी तरी संधी द्यावी असे वाटत असते. मी ‘क्या कूल है हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ चित्रपटासाठी त्यांचे मनापासून आभारही मानू शकलो नाही’ या अशयाचे कॅप्शन त्याने पोस्टला दिले आहे.

follow us

संबंधित बातम्या