Download App

Pritish Nandy Death : मोठी बातमी! प्रसिद्ध कवी, चित्रपट निर्माते प्रितिश नंदी यांचे निधन

Pritish Nandy Death : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार वयाच्या ७३ व्या वर्षी प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी आणि लेखक प्रितिश नंदी

  • Written By: Last Updated:

Pritish Nandy Death : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार वयाच्या 73 व्या वर्षी प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी आणि लेखक प्रितिश नंदी (Pritish Nandy) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र कुशन नंदी यांनी दिली. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

15 जानेवारी 1951 रोजी जन्मलेल्या प्रीतीश नंदी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दूरदर्शन, झी टीव्ही आणि सोनी टीव्हीवर 500 हून अधिक बातम्या आणि चालू घडामोडींचे कार्यक्रम सादर केले. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत एकूण 24 चित्रपट केले, ज्यात ‘चमेली’ आणि ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ व्यतिरिक्त ‘सूर’, ‘कांटे’, ‘हजारों ख्वैशीं ऐसी’, ‘एक खिलाडी एक हसीना’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे.

 

अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रस्तुतकर्ता, कवी आणि लेखक प्रितिश नंदी हे त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी ओळखले जात होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील ते एक प्रमुख नाव होते आणि त्यांच्या ‘चमेली’ आणि ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ सारख्या प्रसिद्ध चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटांचे नेहमीच विशेष कौतुक होते. त्यांनी लिहिलेले शब्द आणि त्यांचा दृष्टीकोन नेहमीच नवनवीन आयाम मांडत असे. असं अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाकुंभ मेळ्यात शाही स्नान कधी होणार? एका क्लीकवर जाणून घ्या सर्व तारखा

follow us

संबंधित बातम्या