पृथ्वी थिएटर, जुहू
अनुपम खेर म्हणतात की, “मुंबईत माझ्या करियरला सुरुवात पृथ्वी थिएटरमधून झाली. इथे सतीश कौशिक यांचा ‘उस पार का नज़ारा’ ह्या नाटकाचा प्रयोग केला, जो आर्थर मिलर यांच्या ‘अ व्यू फ्रॉम द ब्रिज’ वर आधारित होता. येथे मी किरणसोबत अनेक नाटकं केली.”
कालूमल इस्टेट, जुहू
अनुपम खेर म्हणतात की, “कालूमल इस्टेटमधील माझा बी२३ नंबरचा फ्लॅट, हा माझा पहिला वन बीएचके होता, जो मी विकत घेतला.”
बाल गंधर्व रंग मंदिर, बांद्रा वेस्ट
अनुपम खेर म्हणतात की, “3 जून 1981 रोजी मी मुंबईत आलो आणि इथे एका अभिनय शाळेत काम करू लागलो. पण नंतर समजलं की प्रत्यक्षात ती शाळा किंवा इमारत अस्तित्वातच नाही! आम्ही समुद्रकिनारी वर्ग घेत होतो.”
शास्त्री नगर, सांताक्रूझ लिंकिंग रोड एक्सटेंशन
अनुपम खेर म्हणतात की, “1982-83 दरम्यान मी शास्त्री नगरमध्ये चार लोकांसोबत राहत होतो. आम्ही जमिनीवर झोपायचो, आणि पंखाही नव्हता!”
कासा मारिया, बांद्रा
अनुपम खेर म्हणतात की, “सेंट पॉल्स रोडवरील कासा मारिया हे मुंबईतलं माझं तिसरं घर होतं. याच दरम्यान मी सारांश (1984) करत होतो. इथे मी पहिल्या मजल्यावर राहत होतो.”
खेरवाडी, बांद्रा ईस्ट
अनुपम खेर म्हणतात की, “1981 मध्ये मी खेरवाडी, बांद्रा ईस्टमध्ये चार लोकांसोबत राहायला सुरुवात केली. हे माझ्या संघर्षाचं सुरुवातीचं ठिकाण होतं.”