Farmers son letter to gautami patil : सध्या सोशल मीडिया स्टार डान्सर झालेल्या गौतमी पाटीलचे (Gautami Patil) नाव कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर लोकप्रिय झालं आहे. आपल्या लावणीमुळे गौतमीने चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे. गौतमीचा डान्स बघायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आता नुकतचं एका झालेल्या मुलाखतीमध्ये गौतमीने पहिल्यांदा लग्नाविषयी मोठा गौप्यस्फोट केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीने एका मुलाखतीमध्ये आपल्या लग्नाविषयी आणि होणाऱ्या पतीबद्दलच्या आपेक्षाही सांगितल्या होत्या. ती म्हणाली होती. ‘माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. वडिलांचे लवकर निधन झालं, यानंतर घरी कोणीच पुरुष व्यक्ती नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीही कोणत्या पुरुषाबरोबर वैयक्तिक संबंध आला नाही. यामुळे घरामधील जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्याकरिता एकतरी पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे.’
पुढे कसा जोडीदार हवाय यावर गौतमी म्हणाली, ‘मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण कोणत्याही परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला सोबती हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करणार आहे. आता मी २५ वर्षांची आहे, माझं लग्न झाले नाही. पण लवकरच मी लग्नबंधनामध्ये अडकण्याची माझी इच्छा आहे.’
गौतमीच्या या आपेक्षांनंतर बीडमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने थेट गौतमीला पत्रच लिहीलं आहे. मात्र या तरूणाने हे पत्र गौतमीशी लग्न करण्यासाठी लिहिलेले नाही तर त्याने गौतमीला लग्नाविषयी सल्ला दिला आहे. त्याने पत्रामध्ये लिहीलं आहे की, ‘गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तूमचे चाहते लाखो पण लग्नाला तयार कोणीच नाही. आमच्या महारष्ट्रात मुलगी लग्नाला आली की मुलाच्या घरचे मुलीच्या घरचे उंबरठे झिजवतात. तरी पण मुलाला मुलगी मिळत नाही. तुझ्या ठुमक्यावर सर्व जण फिदा पण लग्नाला कोणी तयार होत नाहीत, गौतमी पाटील आत्मपरिक्षण करा.’ असा सल्ला या तरूणाने गौतमीला दिला आहे.
गौतमीच्या या प्रस्तावानंतर बीडच्या एका शेतकरी पुत्रानं गौतमीला पत्र लिहलं आहे. हे पत्र आता चांगलंच व्हायरलं होत आहे. ‘गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तूमचे चाहते लाखो पण लग्नाला तयार कोणीच नाही. आमच्या महारष्ट्रात मुलगी लग्नाला आली की मुलाच्या घरचे मुलीच्या घरचे उंबरठे झिजवतात. तरी पण मुलाला मुलगी मिळत नाही. तुझ्या ठुमक्यावर सर्व जण फिदा पण लग्नाला कोणी तयार होत नाहीत, गौतमी पाटील आत्मपरिक्षण कर असा सल्ला या पत्रात तरुणाने दिला आहे. या तरूणाचं पत्र सध्या चांगलच व्हायरल होत आहे.
Gautami Patil : “मला लगीन कराव पायजे”, गौतमी पाटीलला कसा नवरा हवाय? म्हणाली…
गौतमीवर एकीकडे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण तरी देखील चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात राडा होत असतो. पण तरी देखील तरुण वर्ग तिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली दिसून येते. गौतमी पाटीलच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याला प्रत्येकालाच रस आहे. गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबद्दल आणि जोडीदाराविषयीच्या मोठा खुलासा केला. त्यानंतर सोशल मिडीयावर प्रचंड चर्चा झाल्या तर आता या तरूणाचं पत्र देखील व्हायरल होत आहे.
गौतमी पाटील आपल्या अश्लील डान्सच्या हावभाव करत असल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण तरीही तिने आपल्या अदाकारीने सर्वांना मोठ्या प्रमाणात वेड लावले आहे. गौतमीची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असली, तरीही तिने यासर्व गौष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या डान्सवर जास्त फोकस केला आहे. गौतमीचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.