Download App

Farrey teaser released : सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री करतेय डेब्यू, टीझर रिलीज

Farrey teaser released : गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर करत आहेत. यामध्ये ‘फर्रे’ यांचा उल्लेख केला जात होता. आता हे रहस्य उलगडले आहे. खरंतर, सलमान खानच्या (Salman Khan) प्रोडक्शनमध्ये एक चित्रपट बनत आहे, त्याचे नाव आहे ‘फर्रे’. यासह सुपरस्टारची भाची अलिझेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सलमानची भाची डेब्यू करणार
‘फर्रे’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, यामध्ये अलिझेहसह इतर कलाकार दिसत आहेत. अलिझेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा परीक्षा पद्धती आणि अभ्यास करणारी मुले यावर आधारित असणार आहे. एक थ्रिलर चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. ‘फर्रे’च्या पहिल्या झलकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अनेक युझर्स त्याचे कौतुक करत आहेत. चित्रपटाचा थरारक टीझर चाहत्यांना रोमांचित करत आहे.

Swara Bhaskar Baby Girl: अभिनेत्री स्वरा भास्करने दिला गोंडस मुलीला जन्म, पाहा फोटो

स्वत: सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भाचीच्या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सलमान त्याची भाची अलिझेहला पूर्ण पाठिंबा देत आहे. सलमानने अलिझेहसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

‘फर्रे’चा टीझर पाहून अंदाज बांधता येतो की, हा एक जबरदस्त थ्रिलर चित्रपट असेल. अशा परिस्थितीत, अलिझेह अग्निहोत्री तिच्या अभिनयने प्रेक्षकांची मन जिंकते की नाही हे पाहावे लागणार आहे. अलिझेह ही सलमान खानची बहीण अलविरा खान आणि अभिनेता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. ती तिच्या मामाच्या अगदी जवळची आहे. अंबानी कुटुंबाच्या गणपती पूजेमध्ये अलिझेह आणि सलमान खान एकत्र दिसले होते.

Bollywood Atress : लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन! सिल्व्हर स्क्रीनच नाही बिजनेसमध्येही चमकल्या ‘या’ 6 अभिनेत्री

‘फर्रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केले आहे. यामध्ये अलिझेहसह जेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिश्त, रोनित बोस रॉय आणि जुही बब्बर सोनी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. Farrey 24 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.

Tags

follow us