Download App

Sonu Sood: ‘फतेह’चं शूटिंग संपताच सोनू सूदची खास सफर

Sonu Sood Post: अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ या (Fateh Movie) सिनेमासाठी चित्रीकरण पूर्ण केल्याने चाहत्यांसाठी आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास सफर बघायला मिळाली आहे. त्याने थोड्या निवांत क्षणांची चे काही खास फोटो त्याच्या सोशल मीडियावर (social media) शेयर केले. शांतता आणि थ्रिल चा आनंद घेण्यासाठी सोनू ने त्याच्या व्यस्त चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून ब्रेक घेऊन ही खास ट्रीप केली.


सोनूने त्याची सह-अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिच्यासोबत पडद्यामागील फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने या कलाकारांमधील निर्विवाद केमिस्ट्री पाहायला मिळाली. या दोघांची ऑन-स्क्रीन जादू मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत.

सोनूचा ( Sonu Sood ) आगामी “फतेह” हा सिनेमा अ‍ॅक्शन सीनने भरलेला आहे. अलीकडेच सोनूने काही खास फोटो सोशल मीडियावर शेयर केले असून पडद्यामागील फोटोंची सोनूने खास झलक दाखवली आहे. सोनू सूद आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आकर्षक ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची एक आकर्षक झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. यामुळे हॉलिवूड-शैलीचा थरार अनुभवण्यासाठी आता चाहते उत्सुक झाले आहेत. झी स्टुडिओज, शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने “फतेह” या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ द्या’मधील अंकुर वाढवे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार

सोनूने सोशल मीडियावरील या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “फतेह ही एक जादुई प्रवासाची फक्त सुरुवात आहे, आणि मी या सिनेमाच शूट पूर्ण केल आहे. जॅकी मी तुझ्या नम्रतेची परिश्रमाची आणि समर्पणाची मनापासून प्रशंसा करतो.@jacquelienefernandez ” सोनू आणि जॅकलिनच्या या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us