Fighter : आज वायुसेना दिन (Air Force Day) त्यानिमित्त फायटर (Fighter ) या चित्रपटाच्या कलाकारांनी हवाई दलातील सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. दिग्दर्शक आणि निर्माते सिद्धार्थ आनंद यांचा फायटर हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट हृदयस्पर्शी आणि थरारक व्हिडिओने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आकर्षक कथा असलेला एक हाय-ऑक्टेन अॅक्शन-पॅक असणार आहे.
”…मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते का?”
दरम्यान या चित्रपटाचं शुटींग सुरू आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची खास झलकही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर यावेळी या चित्रपटाच्या कलाकारांनी हवाई दलातील सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. याची खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे.
‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल
काय आहे ही पोस्ट?
वायुसेना दिनाचं औचित्य साधत या कलाकारांनी खास पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की, ” ते अभिमानाने आणि गौरवाने आकाशात उंच भरारी घेतात आणि आपल्या देशाची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अटूट वचन देतात. या वायुसेना दिनी टीम #Fighter आमच्या वैभवशाली भारतीय वायुसेनेच्या योद्ध्यांना सलाम करते ” ही खास पोस्ट प्रेक्षकांना मोहित करून गेली. चित्रपटाचा सार सुंदरपणे टिपले आहे.
चित्रपट कधी येणार?
ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन पुन्हा एकदा सिनेमॅटिक एक अनोखा इतिहास रचण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळणार आहेत. दरम्यान ‘फायटर’ या सिनेमाची घोषणा १० जानेवारी २०२१ दिवशी करण्यात आली होती. त्यानंतर या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करण्यात आली. या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे दोघेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात अनिल कपूरही झळकणार आहे.