”…मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते का?”
मुंबई : शरद पवार हयात आहेत. निवडणूक आयोगाच्या समोर पवार बसले होते अन् प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात आमचा राष्ट्रवादी खरा. मग तिकडे बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते काय? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. निवडणूक आयोगाला काही वाटलं पाहिजे, उद्धव ठाकरे देखील बसले आहेत आणि कोणी दावा सांगतो हा सर्वप्रकार देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्याचा प्रकार आहे. (Sanjay Raut On NCP Party Row)
‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल
अजित पवारांच्या बंडानंतर आता खरी राष्ट्रवादी कुणाची यावरून निवडणुक आयोगात सुनावणी सुरू आहे. नुकतीच याप्रकरणावर पहिली सुनावण पाप पडली. यावेळी अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) समोर बसलेले असताना खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर, पवार हूकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत होते असा गंभीर आरोपही केला होता. या दोन्ही दाव्यांनंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादा गटाचा समाचार घेतला आहे.
पवार समोर बसलेलेल असताना जर तुम्ही खरी राष्ट्रवादी आमची असल्याच्या दावा करत असाल तर, मग समोर बसलेले शरद पवार मेणाचा पुतळा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाला समोर पक्षाचा अध्यक्ष बसलेला असताना कुणीतरी दावा सांगतो हे कितपट पटतं. हे सर्व प्रकार भाजपने सुरू केल्याचे म्हणत या देशाची लोकशाही घटना खड्ड्यात घालणारे हे पक्ष आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
तोडा, फोडा आणि राज्य करा ही भाजपची निती आहे
Jayant Patil : शरद पवार कसे काम करतात? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आज (दि. 9) निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, पाच राज्यातल्या निवडणुका जाहीर होतील. इंडिया आघाडी एकत्र लढेल आणि पाचही राज्यात आम्ही विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करत छत्तीसगड आणि राजस्थान आमच्याकडे आहे. मध्य प्रदेश जिंकलो होतो, तेलंगणा जिंकण्याची खात्री असल्याचे राऊत म्हणाले.
राज्यात भ्रष्टाचार, अनागोंदी माजलेली आहे. बाळासाहेबांना विठ्ठल म्हणत सेना फोडल्याचे राऊत म्हणाले. म्हणजेच भाजप तोडा-फोडा आणि राज्य करा, ही निती राबवत आहे. सेना फोडली आता राष्ट्रवादी फोडली, तिकडे समाजवादी फोडली. मात्र, आता ते एकत्र येत आहेत. भाजपला करायचं ते करु द्या, मूळ विचार पक्षाकडे असतो असे म्हणत शिंदेंची शिवसेना म्हटल्यावर लोकं हसतात.