Download App

सिद्धार्थ आनंदच्या Fighter साठी काऊंटडाऊन सुरू! चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Fighter : सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ ची ( Fighter) रिलीज तारीख जवळ आली असून आता सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. 25 जानेवारी 2024 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. सिद्धार्थ आनंद (Sidharth Aanand) दिग्दर्शित अॅक्शन आणि थ्रिल करण्यासाठी फायटर तयार आहे. रोमांचकारी हवाई सीक्वेन्स आणि उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सोशल मीडियाच्या जगात लाईव्ह मनोरंजन अन् रंगमंचाचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देणे गरजेचे – नरेंद्र फिरोदिया

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मुंबईत स्टार-स्टडेड ट्रेलर लॉन्च इव्हेंट झाला असून दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि कलाकार सदस्य हृतिक रोशन, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय यांनी हजेरी लावली होती.

बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार; म्हणाले, ‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली…’

चित्रपटाचं काउन्ट डाऊन सुरू झाल असून चाहते हृतिक रोशन आणि कलाकारांना रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी वाट बघत आहेत. Marflix Pictures च्या सहकार्याने Viacom18 Studios द्वारे सिद्धार्थ आनंदच्या फायटरची निर्मिती केली आहे. दरम्यान ‘फायटर’ चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू आहे. दरम्यान, हा चित्रपट दररोज लाखोंच्या नोटांचा गल्ला जमवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘फाइटर’ ने रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनमध्ये आतापर्यंत 70.85 लाख रुपये कमावले आहेत. म्हणजेच अॅडव्हान्स बुकिंगमध्येच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करण्याच्या जवळ आला आहे.

हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटाबाबत असा दावा केला जात आहे की, तो अभिनेत्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बँग-बँग’चा ओपनिंग रेकॉर्ड मोडू शकणार आहे. ‘बँग-बँग’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 27.55 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘फाइटर’ 30 कोटींची ओपनिंग घेऊन हा विक्रम मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us

वेब स्टोरीज