Fighter: हृतिक-दीपिकाचा दहशतवादी हल्ल्याचा बदला अन् बरचं काही, ‘फायटर’ चा ट्रेलर प्रदर्शित

Fighter: हृतिक-दीपिकाचा दहशतवादी हल्ल्याचा बदला अन् बरचं काही, ‘फायटर’ चा ट्रेलर प्रदर्शित

Deepika Padukone Fighter Trailer Launch: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या ‘फायटर’ (Fighter Trailer ) चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना दीपिका आणि हृतिकची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे, त्यामुळे क्रेझ खूप आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील हवाई अ‍ॅक्शन थक्क करणारी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)


‘फायटर’च्या ट्रेलर लाँचला दीपिका पदुकोण उपस्थित राहिली नाही. ही पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केली आहे.यामध्ये तिने सांगितले की, ती तिच्या संपूर्ण टीमला खूप मिस करत आहे. पोस्ट शेअर करताना दीपिकाने लिहिले आहे की, मी माझ्या स्क्वाड्रनला मिस करेन… टीमला शुभेच्छा. सध्या काही कारणाने दीपिकाची तब्येत बरी नसल्याने ती उपस्थित राहू शकली नाही. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सिद्धार्थ आनंदला अनफॉलो केले: सिद्धार्थ आनंद आणि दीपिका पदुकोण यांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटात दीपिका पदुकोणला कमी जागा दिल्याने अभिनेत्री आणि दिग्दर्शक यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे दीपिका फायटरच्या प्रमोशनमध्ये सहभागी होत नसल्यची चर्चा सुरु आहे. सिद्धार्थ आनंद अजूनही इंस्टाग्रामवर फायटरच्या उर्वरित स्टारकास्टला फॉलो करतो.

Bhakti Rathore: भक्ती राठोडने केला ‘आंख मिचोली’ मालिकेतील व्यक्तिरेखेबद्दल खुलासा; म्हणाली…

सिद्धार्थ आनंद फायटर थ्रीडीमध्ये रिलीज करण्याचा विचार करत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थला प्रेक्षकांचा अनुभव संस्मरणीय बनवायचा आहे. हा एक हवाई अ‍ॅक्शन चित्रपट आहे, जो फक्त मोठ्या पडद्यासाठी तयार करण्यात आला आहे. फाइटर 25 जानेवारीला 2D, 3D आणि IMAX 3D मध्ये रिलीज होणार आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, फायटर नंतर, दीपिका पदुकोण प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कल्की 2898 एडी’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 9 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवाय ती अमिताभ बच्चनसोबत द इंटर्नमध्ये दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज