Download App

सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर 352 कोटींची कमाई

Image Credit: letsupp

Fighter Movie : हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोनच्या (Depika Padukon) बहुचर्चित ‘फाइटर’ चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रिलिज करण्यात आला. त्यानंतर फायटर चित्रपटाने चांगलच कलेक्शन केलं आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर एकूण 352 कोटींची कमाई फायटरने केली आहे. जवानला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा देशभक्तीपर अॅक्शपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात रांगा लावल्या होत्या. ‘फायटर’ने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली होती.

Jayant Patil : प्रसिद्धीशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही; जयंत पाटलांनी टाकला उलट फासा

सिद्धार्थ आनंदने 2005 मध्ये ‘सलाम नमस्ते’, त्यानंतर 2007 मध्ये ‘ता रा रम पम’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. 2008 मध्ये रणबीर-दीपिका स्टार ‘बचना ए हसीनो’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यावेळी बॉक्स ऑफिसवर रणबीरची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यानंतर आता बहुचर्चित फायटर चित्रपटातून हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोनच्या उत्कृष्ट अभिनयाने आनंदचे नावलौकिक वाढवले आहे.

Nitesh Rane : ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपवासी होणार? तुमचा-आमचा बॉस लवकरच एकच; राणेंचं सूचक वक्तव्य

आनंदने वॉर चित्रपटाचीही निर्मिती केली. त्यामध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची भूमिका असलेला असलेला एड्रेनालाईन-पंपिंग ॲक्शन थ्रिलर हा सिलसिला कायम राहिला आहे. त्याच्या आकर्षक कथानक आणि नेत्रदीपक ॲक्शन सीक्वेन्ससाठी समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली होती. वॉर चित्रपटानेही 475 कोटींहून अधिक कमाई केली आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता.

आनंद दिग्दर्शित पठाण चित्रपटातही शाहरुख खानच्या अभिनयावर प्रेक्षकांची भरभरुन प्रेम केलं. या चित्रपटाने बॉलीवूड बॉक्स ऑफिसवर 1,050 कोटींहून अधिक कमाई केली. 1,000+ कोटींचा चित्रपट (चीनशिवाय) वितरीत करणारा हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि Marflix Pictures च्या संयुक्त विद्यमाने Viacom18 Studios द्वारे निर्मित, फायटर चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. 26 जानेवारीला रिलीज झालेला फायटर आताही थिएटरमध्ये सुरुच आहे.

follow us

वेब स्टोरीज