Nitesh Rane : ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपवासी होणार? तुमचा-आमचा बॉस लवकरच एकच; राणेंचं सूचक वक्तव्य

Nitesh Rane : ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपवासी होणार? तुमचा-आमचा बॉस लवकरच एकच; राणेंचं सूचक वक्तव्य

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका ट्विटर पोस्टवरील प्रतिक्रियेने आणखी एक कॉंग्रेस नेता भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतराचे वारे वाहत असून अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी देखील काँग्रेसमधील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्या दरम्यानच भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका सूचक ट्विटर पोस्टवरील प्रतिक्रियेने आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay vadettiwar) देखील भाजपमध्ये जाणार का? या चर्चांना उधाण आलय.

नेमकं काय आहे ही प्रतिक्रिया?

त्याचं झालं असं की, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांच्या एका वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ ट्विट करत त्यांचा चांगला समाचार घेतला. या पोस्टमध्ये वडेट्टीवार म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजां समोर सत्ताधारी भाजपा आमदारांची भाषा बघा पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील पण कुणी माझा वाकड करू शकणार नाही.’

शेतकरी संघटनांना केंद्राचा एमएसपीचा प्रस्ताव; आंदोलक म्हणाले, सकारात्मक पाऊल उचला, अन्यथा..

‘महिलांचा अपमान करणारी राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली आहे का? महिलांचा अपमान करणारी पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच काम मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा?’ असा सवाल करत वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.

तर त्यानंतर वडेट्टीवार यांच्या याच पोस्टला नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत वडेट्टीवारांच्या भाजप प्रवेशाचे सूचक वक्तव्य केलं. राणे म्हणाले की, ‘कोणी केला महिलेंचा अपमान ? हिंदू भगिनी ना love जिहाद च्या नावाने फसवले जाते तेव्हा तुम्ही कधी बोलताना दिसत नाही. विरोधी पक्ष नेता हा फक्त एका धर्मा च्या बाजुने बोलणारा नसतो. हे लक्षात असून दे.’

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! आता शरद पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

‘MVA च्या काळात पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलीसांची काळजी वाटली नाही का ? असो. आपण original हिंदुत्वादी आहात आणि आमचे जुने सहकारी पण. काय माहीत तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल. म्हणुन. इथेच थांबतो ! जय श्री राम’ असं म्हणत राणे यांनी वडेट्टीवारांच्या भाजप प्रवेशाचे सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे आता वडेट्टीवार देखील भाजपमध्ये जाणार का? त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार? या चर्चांना उधाण आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube