शेतकरी संघटनांना केंद्राचा एमएसपीचा प्रस्ताव; आंदोलक म्हणाले, सकारात्मक पाऊल उचला, अन्यथा..
Farmers Protest: पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. तीन वर्षांपूर्वीही याच शेतकऱ्यांनी राजधानी नवी दिल्लीत एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन (Farmers Protest) केलं होतं. तेव्हा सरकारला कृषी सुधारणांच्या नावाखाली केलेले तीन कायदे मागे घ्यावे लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले. पोलीस प्रशासनानेही दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! आता शरद पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?
रविवारी मध्यरात्रीपर्यंत सरकारशी चर्चा झाल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी दोन दिवस ‘दिल्ली चलो’ आंदोलन थांबवणार असल्याचे सांगितले आहे. दोन दिवसांत, शेतकऱ्यांना सरकारने सादर केलेला किमान आधारभूत किंमतीचा नवीन प्रस्ताव शेतकरी सजून घेतील आणि त्यानंतर भविष्यासाठी नवीन धोरण ठरवतील अशी माहिती आहे. या संदर्भात शेतकरी आंदोलक अभिमन्यू कोहड यांनी पीटीआयशी बोलताना केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाशी नेमकी काय चर्चा झाली? यााबाबत माहिती दिली.
VIDEO | Here’s what farmer Abhimanyu Kohad said on fourth round of talks between government and farmers.
“A detailed and long discussion was held. It, however, was held in a positive atmosphere. We have given them (the government) two days of time. If the government fails to do… pic.twitter.com/DfeBuhwxJl
— Press Trust of India (@PTI_News) February 19, 2024
‘अर्बन’ बॅंक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईचा बडगा! 58 आरोपींच्या मालमत्तेचा होणार लिलाव
ते म्हणाले, आमची सकारात्मक वातावरणात दीर्घ चर्चा झाली. आम्ही सरकारला सांगितलं की, जर तुम्हाला वेळ हवा असेल तर आम्ही तुम्हाला आणखी 2 दिवस देऊ. आणि तोपर्यंत सरकारने काही पावलं उचलली नाही तर 21 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता आम्ही शांततापूर्ण वातावरणात शंभू बॉर्डर आणि खनौरी सीमेवरून दिल्लीकडे कूच करू, असे अभिमन्यू कोहड यांनी सांगितले.
या दोन्ही सीमेवर आतापर्यंत १२५ आणि ७७ शेतकरी जखमी झाले आहेत. सरकारकडून हिंसाचार होत असेल तरी आम्ही त्याला शांततेच्या मार्गाने प्रत्युत्तर देऊ, असेही कोहाड यांनी नमूद केले.
तर शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले, १९ आणि २० फेब्रुवारीला आम्ही एका मंचावर चर्चाकरू आणि तज्ज्ञांचे मत घेऊ. त्याआधारे पुढील निर्णय घेतला जाईल.