Jaya Prada : प्रसिध्द अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना चेन्नई न्यायालयाने (Chennai Court) सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चेन्नईतील रायपेटा येथील थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी जया प्रदा यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. (Actress Jaya Prada jailed for 6 months)
चेन्नईमध्ये जया प्रदा यांच्या मालकीचे थिएटर आहे. हे चेन्नईस्थित थिएटर राम कुमार आणि राजा बेबी चालवतात. थिएटरमधील कामगारांना ईएसआय देण्यास व्यवस्थापन अयशस्वी ठरल्याने कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर जया यांनी कर्मचाऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले आणि याचिका रद्द करण्याची विनंतीसुध्दा केली. लेबल गव्हर्नमेंट इन्शोरन्स कॉर्पोरेशच्या वकिलांनी मात्र, त्यांच्या अपीलवर आक्षेप घेतला. त्यानंतर आता या प्रकणात जया प्रदा आणि इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मनोनित सदस्यपदी वसंत राठोड यांची पाचव्यांदा नियुक्ती!
जया प्रदा यांनी समाजवादी पक्षाकडून रामपूरचे तब्बल दोनवेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून या जागांवर विजय प्राप्त केला. यानंतर सपाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
रामपूरमधून खासदार झालेल्या जया प्रदा यांनी 1994 मध्ये तेलुगु देसम पक्षातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्या 1996 मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर पहिल्यांदा त्यांची निवड झाली होती. त्यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.