कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मनोनित सदस्यपदी वसंत राठोड यांची पाचव्यांदा नियुक्ती!

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मनोनित सदस्यपदी वसंत राठोड यांची पाचव्यांदा नियुक्ती!

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या(Bhingar Cantonment Board) मनोनित सदस्यपदी पुन्हा एकदा वसंत राठोड यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून राठोड यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राठोड यांची पाचव्यांदा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. (Appointment of Vasant Rathod as nominated member of Cantonment Board)

‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची मागील अनेक वर्षांपासून निवडणूक प्रक्रिया रखडलेली आहे. तेव्हापासून संरक्षण मंत्रालयाकडून मानद सदस्यपदी नियुक्ती करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिनियम (2006 क 41) 13 कलमान्वये उपकलम(३) नूसार 11 ऑगस्टपासून नव्याने मानद सदस्यांच्या फेरनिवडीच्या अधिसूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

महायुतीत कोल्ड वॉर? सुनिल तटकरेंनी एका वाक्यात सांगितलं…

महाराष्ट्रातील एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका येत्या 30 एप्रिल 2023 रोजी पार पडणार होत्या. या निवडणुकांसाठी स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु होती. मात्र, अचानक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुका केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्या.

20 दिवसात 20 किलो वजन कसं कमी झालं? हरी नरकेंच्या मृत्यूवर भुजबळांनाही संशय

निवडणूक रद्द झाल्यानंतर राज्य सरकारकडून राज्यातील एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीच्या माहितीचा अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. या अहवालामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द, लोकसंख्या, याबाबतची माहिती राज्य सरकारने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे मागितली आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अहमदनगर महापालिकेत समावेश होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, वसंत राठोड यांनी भिंगारमधील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. नागरिकांवर पडत असणार वाढीव पाणीपट्टीचा बोजा कमी करण्यासाठी त्यांनी खासदार विखेंच्या माध्यमातून रक्षा मंत्रालयाकडे पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे. नागरी समस्या सोडवण्यासोबतच अनेक सामाजिक कार्यात राठोड आपला सहभाग नोंदवत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाने देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या आहेत. या निवडीमध्ये भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मानद सदस्यपदी भाजपा भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड यांची पाचव्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube