20 दिवसात 20 किलो वजन कसं कमी झालं? हरी नरकेंच्या मृत्यूवर भुजबळांनाही संशय

20 दिवसात 20 किलो वजन कसं कमी झालं? हरी नरकेंच्या मृत्यूवर भुजबळांनाही संशय

Hari Narake Passed Away : ज्येष्ठ सामाजिक लेखक प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर लेखक संजय सोनावणी यांनी धक्कादायक खुलासे केले होते. यानंतर त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी अनेकांकडून करण्यात आली आहे. यावर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. 20 दिवसात 20 किलो वजन कसं कमी झालं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सप्टेंबर मध्ये 15 ते 20 दिवस त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यांना तिथं चांगली ट्रिटमेंट झाली आणि त्यामध्ये ते बरे झाले. त्यानंतर काही दिवसांनी ते भोपाळ मध्ये भाषण करायला गेले. त्यावेळी त्यांचे वजन वाढले होते. त्यांचे भाषण ऐकायला आलेले एक डॉक्टर त्यांना म्हणाले की तुमच्या शरीरात पाणी वाढले आहे. ते डॉक्टर त्यांना जामनगरला घेऊन गेले. त्यानंतर दोन चार दिवसांनी मला फोन आला की पाच दिवसांत माझे 5 किलो वजन कमी झाले आहे. आणखी एका आठवड्यात 10 किलो वजन कमी झाले. परत वीस दिवसांनंतर म्हणाले 20 किलो वजन कमी झाले. त्यानंतर मी त्यांना म्हटले की आता बस झाले पुणे, मुंबई मध्ये जाऊन अॅडमीट व्हायला पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

सरकार पाडण्याची सुरूवात शरद पवारांनी केली; सुप्रिया सुळेच्या आरोपांवर शाहांचा पलटवार

सोनवणी यांना जो मेसेज केला तो आमच्याकडे पण आहे. त्याच्यामध्ये पुण्याचे डॉक्टर चुकले, मुंबईचे डॉक्टर चुकले आणि जामनगरच्या डॉक्टरनी मला बरं केलं, असं त्यामध्ये लिहिले आहे. पण मुंबई, पुण्यात मोठेमोठे डॉक्टर आहेत तिथं एक डॉक्टर नाही, 50 डॉक्टर त्यांना येऊन बघत होते आणि त्याला वर्ष झालं. आता पोस्टमॉर्टम झालं आहे. त्याचा रिपोर्ट येईल. कारण आहे ते बघायला पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

हरी नरके यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की 15 दिवस ते फक्त हॉस्पिटल मध्ये होते आणि ते स्वतः डॉक्टर होते. मी त्यावर जास्त बोलणार नाही. परंतु जामनगर मध्ये जाऊन 20 किलो वजन घटले त्याची मला शंका आहे. अशी कुठली औषध दिले त्यांना की 20 दिवसात 20 किलो वजन कसं कमी झालं? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची मोठी हानी : छगन भुजबळ

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, आमदार कपिल पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि समता परिषदेचेही कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीच मोठं नुकसान झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. दरम्यान, नरके यांचा मृत्यू कसा झाला काय झाला याबद्दल गैरसमज पसरवू नका, अस आवाहन यावेळी भुजबळ यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube