सरकार पाडण्याची सुरूवात शरद पवारांनी केली; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर शाहांचा पलटवार

सरकार पाडण्याची सुरूवात शरद पवारांनी केली; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर शाहांचा पलटवार

Amit Shah on Sharad Pawar : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अविश्वास ठरावावर आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी सुळे यांनी मोदी सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. भाजपने अनेक राज्यातील सरकारं पाडल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला आज गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरूवात शरद पवारांनी केल्याचा आरोप त्यांनी केला (Amit Shah on supriya sule athey said Sharad Pawar started to topple the government)

आज सभागृहात बोलतांना अमित शाह म्हणाले की, भाजपवर सरकारं पाडण्याचा आरोप सुप्रिया सुळे करत आहेत.  पण महाराष्ट्रातील पहिलं सरकार कोणी पाडलं, तर ते शरद पवारांनी पाडलं. वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून शरद पवारांनी भारतीय जनसंघाचं समर्थन घेतलं आणि मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरूवात शरद पवारांनी केल्याचा आरोप शाह यांनी केला.

हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त 

शाहांनी केलेल्या या आरोपाचं सुप्रिया सुळेंनी खंडन करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, जेव्हा भारतीय जनसंघासोबत पवार गेले, त्यावेळी समाजवादी नेते एसएम जोशी हे जनसंघात होते. त्यामुळं पवार हे जनसंघासोबत गेले. ते भाजपसोबत गेले नाही, आणि तेव्हा भाजप हा पक्षही नव्हता. त्यावर शाह म्हणाले, पण मुख्यमंत्री कोण कोण बनलं, सत्ता कोणी भोगली? असा सवालही शाह यांनी केला.

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
भाजपला केंद्रातील सत्तेल येऊन 9 वर्ष पूर्ण झाल्यानं केंद्र सरकारकडून देशात नवरत्न नौ साल अभियान राबवण्यात येते. पण गेल्या 9 वर्षात या सरकारने काय? तर अनेक राज्यातील सरकारं भाजपने पाडली. गेल्या 9 वर्षात 9 राज्य सरकारं भाजपने पाडल्याची टीका सुळे यांनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube