मुंबई: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (Goa International Film Festival) फिल्म बाजार विभागाकरिता छबिला (Chhabila), विषय हार्ड, तेरव, आत्मपॅम्प्लेट (Aatmapamphlet) या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांचे प्रदर्शन (स्क्रिनिंग) दिनांक 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत फिल्म बाझार येथे होणार आहे.
मोठी बातमी ! रोहित पवारांच्या कारखान्याचा एमडीच पैशांसह पकडला; किती पैसे वाटले ?
निवड करण्यात आलेल्या विषय हार्ड या चित्रपटाचे प्रदर्शन (स्क्रिनिंग) २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता, छबिला २२ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता, आत्मपॅम्प्लेट २३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता आणि तेरव २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता कार्यक्रम स्थळी (हॉटेल मॅरिएट ) येथे होणार आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या चारही चित्रपटांचे प्रमोशन व्यापक स्वरूपात व्हावे यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील निर्मिती संस्था व व्यक्तींसोबत बैठकांचे आयोजन करण्यासह चित्रपट प्रत्येकाच्या वेळेनुसार पाहता यावेत यासाठी विविंग रूमची सुविधा सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याशिवाय नॉलेज सीरिज परिसंवादामध्येही महामंडळाचा सहभाग राहणार आहे. आणि विशेष म्हणजे आकर्षक सजावट केलेले फिल्म ऑफीसदेखील येथे तयार करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासा, दूध का दूध, पानी का पानी होईल; पैसे वाटल्याचा आरोपावर तावडेंची प्रतिक्रिया
२०१५ पासून मराठी चित्रपट फिल्म बाजारात पाठवले जातात…
मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी या करिता २०१५ पासून फिल्मसिटीच्या माध्यमातून गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारात सहभाग घेतला जात आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. यंदाही चार चित्रपटासह निवडण्यात आलेल्या चारही चित्रपटांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या आपण घेऊन जात आहोत.