प्रेरणा जंगम
Digpal Lanjekar: मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराज, (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांची शौर्यगाथा आणि त्यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिंवत करण्याचं उत्तम काम करतात ते म्हणजे दिग्दर्शक, लेखक दिग्पाल लांजेकर. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या संकल्पनेतून शिवराज अष्टकातील विविध चित्रपटांना महाराष्ट्रभर शिवभक्तांनी उत्तम प्रतिसाद देत ते लोकप्रिय ठरले आहे. आगामी काळात इतिहासातील महत्त्वाचं पान रुपेर पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमावर आधारित चित्रपट दिग्पाल आगामी काळात घेऊन येत आहे. शिवरायांचा छावा (Shivrayancha Chhava marathi movie) असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिग्पाल लांजेकर आणि टीमने मिळून केप कापून हा क्षण साजरा केला आहे. यावेळचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये दिग्पाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिग्पाल यांनी लिहिले आहे की, “माझी कलारुपी सेवा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शंभू राजांच्या चरणी सुद्धा मी अर्पण करू शकलो, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. छत्रपती शंभू राजांच्या पराक्रमावर आधारित ही चित्रकृती तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल.
दिग्पाल लांजेकर यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही रुपेरी पडद्यावर मराठ्यांचा इतिहास जिवंत करेल आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा इतिहासातील ही शौर्यगाथा अनुभवता येईल एवढं नक्की. या चित्रपटाविषयी निर्माते सनी रजानी सांगतात की “माझ्या पहिल्याच चित्रपटाचे ‘शिवरायांचा छावा’ चे चित्रीकरण सलग ३३ दिवसांच्या विक्रमी वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण झाले. दिग्पाल सरांसोबत काम करणे हा आमच्यासाठी खरोखरच एक आनंददायी अनुभव होता. ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारा अभ्यासू दृष्टिकोन हा त्यांच्या सेटवरील प्रत्येक कामातून दिसून येत होता.
Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले
मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले आहे. आत्तापर्यंत मी ज्यांच्यासोबत काम केले आहे, त्यांच्यापैकी दिग्पाल सर एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या विषयावर इतके संशोधन केले आहे. त्यांची इतिहासाबद्दल आणि छत्रपती शिवरायांप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी आहे, मल्हार पिक्चर्स कंपनीची निर्मिती असलेला हा पहिला चित्रपट सादर करताना मला खूप अभिमान वाटतो. मला खात्री आहे की हा चित्रपट रसिक प्रेक्षक देखील आनंदाने स्वीकारतील आणि ही मोहीम यशस्वी करतील. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, सनी रजानी आणि वैभव भोर निर्मित ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या साहसाची आणि शौर्याची गाथा मांडण्यात आली आहे. हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आले आहे.