Final round of Bolibhasha one-act play competition : ‘सुप्रिया प्रॉडक्शन’तर्फे दरवर्षी घेण्यात येणारी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा नाट्यक्षेत्रात महत्त्वाची मानली जाते. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष असून, अलीकडेच या स्पर्धेची यंदाची प्राथमिक फेरी पार पडली. या फेरीतून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. यंदाच्या या स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवार, 29 जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत रंगणार आहे. विविध बोलीभाषांतील एकांकिका यावेळी सादर होणार असून, रसिकांना त्यांचा आस्वाद घेता येणार आहे.
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची मूळ संकल्पना असलेल्या या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेला, नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त स्वरूप दिले. आता गोविंद चव्हाण यांच्या पश्चात त्यांची कन्या सुप्रिया चव्हाण हिने या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. विविध बोलीभाषांना व्यासपीठ मिळावे, हा हेतू या स्पर्धेच्या मागे आहे. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे.
सातारा जिल्हा ड्रग्स नेटवर्कचं केंद्र बनतोय का?; DRI विभागाच्या कारवाईत तब्बल 6 हजार कोटींचे ड्रग्स जप्त
यंदा या स्पर्धेत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या नाट्यसंस्थांनी प्राथमिक फेरीत सहभाग घेतला होता. यातून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. ‘सपान’ (डॉक्टर्स थिएटर ग्रुप – माणदेशी), ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ (सृजन द क्रिएशन – मालवणी), ‘पाकळ्या’ (नक्षत्र कलामंच – खान्देशी), ‘डिझाईन’ (डॉ. टी.के.टोपे रात्र महाविद्यालय – घाटी), ‘त्यात काय!’ (एकदम कडक नाट्यसंस्था – घाटी), ‘सत्य’ (नाट्यारंभ एन.के.टी.टी. – मालवणी) आणि ‘पाकिस्तानचं यान’ (नाट्यांकुर – घाटी) या एकांकिकांमध्ये आता अंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांतून पंकज गुप्ता, दर्शन पाटील, प्रियांका जाधव, विनायक आभाळे, देवेंद्र देव आणि डॉ. मेघा गावडे यांना अभिनयाची पारितोषिके जाहीर झाली आहेत. रंगकर्मी मंगेश सातपुते व संदीप रेडकर यांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. आता सर्वांचे लक्ष स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे लागले
