Finally the reason behind Abhijeet Sawant’s new look is out He will be performing this new song after Chal Turu-Turu : सदाबहार आवाजाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला गायक म्हणजे अभिजीत सावंत. अभिजीत सावंतला संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण झाली असून अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करताना दिसतोय. अशातच अभिजीत ने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर नव्या लूकचे फोटो शेयर केले होते आणि आता या लूक मागचं खरं कारण समोर आलं आहे.
‘निबार’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
अभिजीत ” पैसा थेंब थेंब गळं ” हे नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं कळतंय. अभिजीत च्या आवाजाची जादू आजवर सगळ्यांनी अनुभवली आहे आणि तो येणाऱ्या काळात देखील वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स करणार आहे.मागच्या काही दिवसात झालेल्या मुलाखतीमधून अभिजीत गाण्याच्या सोबतीने अभिनय देखील करणार का? अश्या चर्चांना उधाण आलं होत. पण अभिजीत गायक म्हणून तर सगळ्यांना माहीत आहे पण तो अभिनय देखील करणार का हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
मिड एअर फ्रीव्हर्स! सनी कौशलचा रॅप डेब्यू, पंजाबी शैली अन् स्फोटक ऊर्जा
इंडियन आयडॉलपासून अभिजीतच्या सांगतिक प्रवासाला सुरुवात झाली. आज हा संगीत विश्वातला त्याचा प्रवास 20 वर्ष पूर्ण करत असताना पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यानं मोहित केलं आहे. बिग बॉसनंतर प्रेक्षकांना अभिजीत काय नवीन करणार, याची उत्सुकता होती.‘चाल तुरु तुरु’ सारख्या जुन्या गाण्याला नवा स्पिन ट्विस्ट देणं, देखील तितकच आव्हानात्मक होतं. पण, प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा दृष्टीने हे गाणं अभिजीतने केलं. आता प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देतात.
तारीख ठरली! माजी आमदार मुरकुटेंची पुन्हा नवी इनिंग ‘या’ दिवशी करणार शिंदे गटात प्रवेश
एकंदरीत काय अभिजीतने आजवर त्यांचा प्रेक्षकांना नवनवीन गाण्याची मेजवानी तर दिली, पण आता तो पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतोय. त्यानंतर आता हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार हे नक्की.