Download App

Marathi Movie : मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजुरीसाठी नवी समिती गठीत

मुंबई : मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करणाऱ्या समितीत बदल करण्यात आला आहे. पहिली समिती रद्द करून समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. या चित्रपटांची निवड करण्यासाठी एक समिती नेमली जाते. नव्याने 13 अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये आता विजू माने, गिरीश मोहिते, किशोरी अंबिये, राकेश सारंग, विजय कदम, पुरुषोत्तम बेर्डे, विनोद सातव, शैलेश गोजमगुंडे, गीतांजली ठाकरे, रमेश कुलकर्णी, स्वप्नील दिगडे, संदीप पाठक, डॉ. प्रकाश जोशी यांचा समावेश आहे.

Pathan : रिलीज होऊन सहा आठवडे, यशराज फिल्म्सच्या पठानचा करिश्मा कायम !

बुधवारी 8 मार्चला मंत्रालयातील समिती सभागृहात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते यावर्षीच्या मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानाचे वाटप करण्यात आले. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते.

Tags

follow us