DHARMAN : ‘राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल’ने (RaajKamal Films International) ‘धर्मा’ (DHARMAN) या चित्रपटाची घोषणा केली आहे. यात सुपरस्टार रजनीकांत एका दमदार नवीन अवतारात दिसणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्वथ मारिमुथू करत आहेत. आज या चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृत सुरुवात झाली असून, निर्मात्यांनी याचे शीर्षक आणि ‘फर्स्ट लूक’ प्रदर्शित केला आहे. यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत उत्सुकतेने वाट पाहिली जाणाऱ्या या प्रकल्पाची पहिली झलक प्रेक्षकांना मिळाली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरत, ‘धर्मा’ हा चित्रपट दोन दिग्गज कलाकारांना निर्माता-अभिनेता म्हणून पहिल्यांदाच एकत्र आणत आहे. पाच दशकांहून अधिक काळ मैत्रीचे नाते जपणारे कमल हासन आणि सुपरस्टार रजनीकांत या महत्त्वपूर्ण प्रोजेटद्वारे एकत्र येत आहेत, ज्यामुळे पिढ्यानपिढ्यांच्या चित्रपटप्रेमींसाठी हा एक अत्यंत खास प्रसंग ठरला आहे. ‘राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल’च्या बॅनरखाली कमल हासन आणि आर. महेंद्रन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच, सुपरस्टार रजनीकांत यांचे ‘आरकेएफआय’ (RKFI) सोबतचे हे पहिलेच सहकार्य असून, या प्रतिष्ठित स्टुडिओच्या गौरवशाली वारशात आणखी एका मैलाचा दगड रोवला गेला आहे.
डिस्ने (Disney) सह-निर्माता असलेल्या आणि समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी दिग्दर्शक अश्वथ मारिमुथू यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा ‘धर्मा’ हा चित्रपट एका सशक्त सर्जनशील दृष्टिकोनासह एक उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देतो. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत पडद्यावर सिमरन आणि राशी खन्ना यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीही दिसणार असून, यामुळे एक दमदार कलाकार मंडळी एकत्र आली आहे.
या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढवणारी बाब म्हणजे याचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. त्यांच्या ब्लॉकबस्टर गाण्यांनी आणि जबरदस्त पार्श्वसंगीताने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील ॲक्शन दृश्यांचे दिग्दर्शन (कोरिओग्राफी) राष्ट्रीय पुरस्कार विजेती जोडी ‘अंबरिव’ (Anbariv) करणार आहे; भारतीय चित्रपटसृष्टीतील काही सर्वात अविस्मरणीय ॲक्शन दृश्ये साकारण्यासाठी ही जोडी ओळखली जाते. चेन्नईमध्ये आज चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शुभारंभ सोहळ्याने मुख्य चित्रीकरणाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला कलाकार, क्रू सदस्य, निर्मिती टीम आणि मान्यवर उपस्थित होते. ‘राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल’चा वारसा आणि जागतिक दर्जाची सर्जनशील टीम यांची साथ लाभलेला ‘धर्मा’ हा चित्रपट आगामी काळात भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.
