First look of ‘Yellamma’ released! : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी नवीन घोषणा करण्याची एक परंपरा आहे अस म्हणणं वावगं ठरणार नाही आणि जेव्हा तो वाढदिवस रॉकस्टार डीएसपीचा असतो तेव्हा सुरुवातीपासूनच काय नवीन बघायला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता असते. २ ऑगस्ट रोजी पॅन-इंडिया संगीतकार डीएसपीने आपला वाढदिवस साजरा करत असताना सोबतीला “येल्लम्मा” चा निर्मात्यांनी चाहत्यांसाठी चित्रपटसृष्टीसाठी आणि गेली जवळपास दोन दशके इतरांना त्यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण देणाऱ्या या कलाकारासाठी एक खास भेट दिली !
“येल्लम्मा” मधील पारशीच्या भूमिकेतील डीएसपीचा फर्स्ट लूक प्रदर्शित करून मोशन पोस्टरमध्ये डीएसपी पारशीच्या भूमिकेची झलक बघायला मिळाली. साधा पट्टेदार शर्ट आणि काळी पँट परिधान केलेला देवी येल्लम्माचा सुशोभित मुकुट अत्यंत आदराने हातात धरलेला त्याच्या चेहऱ्यावरची शांत, जमिनीशी जोडलेली आणि अनुभवातून आलेली स्थिरता अशी आहे की ती केवळ अभिनयाच्या प्रशिक्षणातून निर्माण होऊ शकत नाही.
राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बेकायदा धर्मांतराविरोधात सरकारचा मोठा निर्णय
निर्मिती संस्थेने कॅप्शनमध्ये लिहिले “#Yellamma… आणि त्यात एक माणूस आहे—PARSHI ❤️🔥 जमिनीशी नाळ जोडलेल्या भूमिकेत ACTOR @ThisIsDSP ला सादर करत आहोत असं नाव जे तुम्ही लक्षात ठेवाल आणि असा प्रवास जो तुम्ही कधीच विसरणार नाही 🔥 आपण नेहमी त्याच्या संगीताचा उत्सव साजरा करतो… आता त्याच्यासोबत त्याला रुपेरी पडद्यावरही साजरा करूया 😍 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, रॉकस्टार डीएसपी जे येणार आहे त्यासाठी जग अजून तयार नाही 💥
डीएसपीसाठी पारशी ही फक्त त्याने साकारलेली व्यक्तिरेखा नाही तर अनेक वर्षांपासून त्याच्या मनात जपलेली ओळख आहे. कॅमेरे सुरू होण्यापूर्वीच त्याने पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आपल्या दिवंगत वडिलांचे गाव वेदुरुपाका येथे भेट दिली देवी येल्लम्माच्या सन्मानार्थ भरवल्या जाणाऱ्या अम्मोरू जत्रेत सहभागी झाला ढोल वाजवले, स्थानिकांसोबत नृत्य केले आणि वडिलांच्या प्रतिमेसमोर हात जोडून उभा राहिला.
तो सांगतो “त्या भेटीमुळेच त्याने येल्लम्माला होकार दिला. फर्स्ट लूकमध्ये त्या सत्याची प्रत्येक छटा दिसून येते. पारशी आपल्या साधेपणातच विलक्षण आहे”
