Download App

पाच अफेअर्स, पाकिस्तानसाठी हेरगिरी, लतादीदींशी वाद; असं होतं ट्रॅजेडी किंगचं आयुष्य

Dilip Kumar : पाच अभिनेत्रींशी अफेअर, पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, आयुष्यात अनेक वादळं, पडद्यावर देखील या अभिनेत्याने अशाच काहीशा भूमिका साकारल्या. प्रत्येक डायलॉगमध्ये दुःख, प्रेम त्याच्या डोळ्यातच त्याचे संवाद स्पष्ट दिसायचे. हा निष्पाप चेहऱ्याचा तरूण कधी चित्रपटसृष्टीवर राज्य करेल असं तेव्हा अनेकांना वाटलंही नव्हतं. कारण त्याला चित्रपसृष्टीचा कोणताही वारसा नव्हता. एक नवं नाव अन् नव्या ओळखीसह त्याने ट्रॅजेडी किंग म्हणून आपली ओळख निर्माण केली. पण कोण आहे हा अभिनेता पाहूयात… ( Five Affairs’ of Pakistan’s Agent, crises with Lata Mangeshkar was Tragedy king Dilip Kumar Life )

…म्हणून चिन्मय मांडलेकर म्हणतोय, उद्या मिळणार एक आनंदाची बातमी!

ट्रॅजेडी किंग म्हणून आपली ओळख निर्माण करणारा हा अभिनेता दुसरा कोणी नाही तर प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार आहेत. त्यांनी जस अभिनयावर राज्य केलं तसेच ते वादांच्या भोवऱ्यातही अनेकदा सापडले. मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं नात आणि त्यानंतरचे वाद अनेकांना माहिती आहेत. मात्र त्यांचे लता मंगेशकर यांच्याशी झालेले वाद अनेक दिवस चालले.

‘गदर’ला विरोध; सनी देओलचा मोठा खुलासा…

ही गोष्ट आहे 1957 ची मुसाफिर चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. लता मंगेशकर या चित्रपटातील लागी नाही छूटे या गाण्याचं रेकॉर्डिंग करत होत्या. तेव्हा दिलीप कुमार म्हणाले होते की, या मराठी लोकांची उर्दू वरण-भातासारखी असते. ही गोष्ट ऐकताच लतादीदींनी ठरवलं की, उर्दू शिकायचं त्या उर्दूही शिकल्या आणि अनेक वर्ष त्या दिलीप कुमार यांच्याशी बोलत देखील नव्हत्या. त्यानंतर लेखक खुशवंत सिंगांच्या प्रयत्नांनी त्यांनी एकमेकांशी बोलायला सुरूवात केली.

दिलीप कुमार यांचा आणखी एक किस्सा म्हणजे त्यांचे अनेक अभिनेत्रींशी असलेले अफेअर्स सुरूवातीला त्यांचं नाव त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशलशी जोडलं गेलं. मात्र त्यांची कुटुंब लग्नाला तयार नव्हते. असं सांगण्यात येत. त्यानंतर मधुबाला आणि दिलीप कुमारची जोडी अत्यंत वाईट वळणावर येऊन तुटली.

त्यानंतर वैजयंती माला आणि दिलीप कुमार यांचंही नाव एकमेकांसोबत जोडलं गेलं होतं. तर 1966 मध्ये त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी त्यांच्याहून 22 वर्षांनी लहान वर्षांच्या सायरा बानूशी विवाह केला. तेव्हाच त्यांनी आसमा नावाच्या पाकिस्तानी महिलेशीही त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र त्यांचं हे नातं केवळ तीन वर्षच टिकलं. हे व यांसारख्या अनेक ट्रॅजेडी किस्सांनी या ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचं आयुष्य चर्चेत राहिलं.

Tags

follow us