Download App

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्की अभिजीतला शिकवतेय चहा बनवायला

Bigg Boss Marathi Season 5 Day 60: 'बिग बॉस मराठी'च्या घरात मालक आणि सांगकामे दोघेही आपल्या पद्धतीने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 Day 60: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात (Bigg Boss Marathi Season 5 ) मालक आणि सांगकामे दोघेही आपल्या पद्धतीने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. (Bigg Boss Marathi) आजच्या भागात निक्की (Nikki Tamboli) अभिजीतला (Abhijeet Sawant) चहा बनवायला शिकवताना दिसून येणार आहे. अभिजीतला निक्की म्हणतेय,”आधी पाणी घे, त्यात चहापावडर टाक, उकळल्यानंतर त्यात इलायची टाक, मग आलं टाक.. चांगलं उकळ्यानंतर त्यात साखर टाक.. मग शेवटी दूध टाक”. त्यानंतर मला अरबाज नाव लिहिलेल्या माझ्या कपमध्ये चहा दे”. निक्कीने शिकवलेला स्पेशल चहा आजच्या भागात अभिजीत बनवताना दिसून येईल. एकंदरीतच या आठवड्यात प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.


अभिजीतने केली निक्कीची नक्कल

मालक डीपी दादा सांगकामे अभिजीतला निक्कीची नक्कल करायला सांगणार आहेत. अभिजीतने निक्कीची केलेली नक्कल पाहून घरात एकच हशा पिकणार आहे. जान्हवी अरबाजला निक्कीविरोधात भडकवते. तिची रिअॅक्शन जान्हवीवर काय असणार आणि अरबाजवर काय असणार? असा प्रसंग डीपी दादा अभिजीतला देतात आणि त्यावर निक्कीची नक्कल करायला लावतात. दरम्यान निक्कीची नक्कल करत अभिजीत म्हणतो,”बाई… तुला माझ्यावर विश्वास आहे तर तू जातो का तिकडे…असं का करतोस तू?”. त्यानंतर निक्की अभिजीतला माझी नक्कल करतोस का? असं विचारते.

सांगकाम्यांवर हा टास्क भारी पडणार?

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये,”मालक निक्की म्हणतेय,”चला ड्युटीला लागा सांगकाम्या”. त्यानंतर वर्षा ताई अंकिता आणि जान्हवीला त्यांचा पाय व्यवस्थित दाबण्यास सांगत आहेत. जान्हवी पुढे डाव्या हाताने पिठ मळताना दिसून येत आहे. दुसरीकडे पॅडी दादा सूरजची मालिश करताना दिसत आहेत. मालिकांनी सांगितलेली कामे करुन करुन जान्हवीच्या डोळ्यात मात्र पाणी आलं आहे.

Bigg Boss Marathi: घरात रंगणार लगोरीचा खेळ; अंकिता आणि वर्षा ताईंमध्ये होणार जोरदार राडा

वर्षा ताई म्हणताय,”आय लाइक यू अहा अहा…”

आजच्या भागात मालक वर्षा ताई आणि सांगकाम्यांपैकी अभिजीत घरातील कामांबद्दल आणि कोथिंबिरबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. वर्षा ताई आणि अभिजीत पुढे ‘आय लाइक यू अहा..अहा” हे गाणं म्हणत धमाल डान्स करताना दिसत आहेत. वर्षा ताई पुढे म्हणतात,’आय लाइक यू कोथिंबीर”. कोथिंबीरबद्दल मला विशेष आस्था आणि ज्ञान आहे”.

follow us