Bigg Boss Marathi : डीपीने निक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत घातलं गाऱ्हाणं

Bigg Boss Marathi : डीपीने निक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत घातलं गाऱ्हाणं

Bigg Boss Marathi Nikki Tamboli Birthday Celebration : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन दणक्यात (Bigg Boss Marathi New Season) सुरू झाला असून आता सदस्यांचे वाढदिवसदेखील यायला सुरुवात झाली आहे. (Bigg Boss Marathi) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज निक्कीचा जल्लोषात वाढदिवस साजरा होणार आहे. आजच्या भागात निक्कीच्या वाढदिवसानिमित्त (Nikki Tamboli Birthday ) डीपी दादांनी (DP Dada) खास गाऱ्हाणं घातलेलं पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


निक्कीला शुभेच्छा देत डीपी दादा म्हणत आहेत, (Bigg Boss Marathi New Promo) “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. 75 वर्षे जग.. तुझं असचं तारुण्य टिकूदेत. लोकांना छळू नकोस. त्यांना त्रास देऊ नकोस. लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक. पण कोणाला काही मानसिक त्रास देऊ नकोस. तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा…शुभेच्छूक साधासुधा एक पलिकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस”. आजच्या भागात निक्की डीपी दादांना सांगते,”मला वीट आलाय. माझा सर्वोत्कृष्ट वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी ‘बिग बॉस’ला धन्यवाद म्हणते. माझे डोळे उघडलेत. टॉपला जायचं तर एकत्र जाऊयात. मी एखाद्याला निवडलं ना तर त्याच्यासाठी मी सर्वांसोबत लढू शकते. पण समोरच्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत. अभिजीत मला समजून घेतो”. एकंदरीतच निक्कीला अभिजीतचा प्रचंड राग आलेला आहे. याबद्दल घरातील इतर सदस्यांकडे ती व्यक्त होताना दिसून येते.

निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

समोर आलेल्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की इरिनाला म्हणतेय,”बरं झालं नॉमिनेट झाली…आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे”. त्यावर वैभव म्हणतो,”निक्की अती होतंय आता”. निक्की पुढे म्हणते,”इरिना माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती. नंतर अॅड झाली आहे”. निक्कीला थांबवत वैभव म्हणतो,”हे असलं फालतू काही मी ऐकूण घेणार नाही”. त्यावर निक्की म्हणते,”मी तुला नाही इरिनाला म्हणाली आहे”. वैभव म्हणतो,”बोलूच नको… हातातील बोटं तोंडात घाल”. यावर निक्की म्हणते,”मी तुला माझा PA म्हणून घरातून घेऊन आलेली नाही”.

Bigg Boss Marathi 5 : इरीनावरून निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

निक्की अन् अभिजीतमध्ये रंगली चर्चा!

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अभिजीत आणि निक्की अरबाजच्या वागणुकीवर चर्चा करताना दिसत आहेत. निक्की म्हणते,”अरबाजला वाटतं की आम्ही सगळे याच्याविरोधात आहोत. तर तू का नाहीस. मी अभिजीतसोबत असल्याचं त्याला खटकतं”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube