Bigg Boss Marathi 5 : इरीनावरून निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

Bigg Boss Marathi 5 : इरीनावरून निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

Bigg Boss Marathi New Season Day 27 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) नॉमिनेशन टास्कमध्ये (Nomination) कालच्या भागात जान्हवीने आर्याला, आर्याने इरिनाला, घनश्यामने अभिजीतला तर अभिजीतने वैभवला नॉमिनेट (Nomination) केलं आहे. (Bigg Boss Marathi New Season) त्यामुळे या आठवड्यात आर्या, इरिना, अभिजीत आणि वैभवपैकी कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आता आजच्या भागात नॉमिनेशनवरुन निक्की आणि इरिना, वैभवमध्ये कल्ला झालेला पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


समोर आलेल्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की इरिनाला म्हणतेय,”बरं झालं नॉमिनेट झाली…आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे”. त्यावर वैभव म्हणतो,”निक्की अती होतंय आता”. निक्की पुढे म्हणते,”इरिना माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती. नंतर अॅड झाली आहे”. निक्कीला थांबवत वैभव म्हणतो,”हे असलं फालतू काही मी ऐकूण घेणार नाही”. त्यावर निक्की म्हणते,”मी तुला नाही इरिनाला म्हणाली आहे”. वैभव म्हणतो,”बोलूच नको… हातातील बोटं तोंडात घाल”. यावर निक्की म्हणते,”मी तुला माझा PA म्हणून घरातून घेऊन आलेली नाही”.

निक्की अन् अभिजीतमध्ये रंगली चर्चा!

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अभिजीत आणि निक्की अरबाजच्या वागणुकीवर चर्चा करताना दिसत आहेत. निक्की म्हणते,”अरबाजला वाटतं की आम्ही सगळे याच्याविरोधात आहोत. तर तू का नाहीस. मी अभिजीतसोबत असल्याचं त्याला खटकतं”.

Bigg Boss Marathi : निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार? पाहा प्रोमो

निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार?

निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे,”तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला. निक्की पुढे अभिजीतला म्हणते,”त्याचं म्हणंन हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?”. तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो, अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार”. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube