Bigg Boss Marathi : निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi : निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi New Season Day 27 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला आता (Bigg Boss Marathi New Season ) चार आठवडे पूर्ण होत आहेत. (Bigg Boss Marathi) गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे ( Abhijeet Sawant) निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाज (Arbaz Patel) यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे,”तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला.

निक्की पुढे अभिजीतला म्हणते,”त्याचं म्हणंन हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?”. तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो, अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार”. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रितेश भाऊचं नवा विक्रम

‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.0 रेटिंग मिळाले आहे. एकंदरीतच ‘भाऊच्या धक्क्याला’ 3.9 एव्हरेज रेटिंग मिळाले आहे. ‘बिग बॉस मराठी’ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर ‘बिग बॉस मराठी’ने स्वत:चाच अनोखा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने इतिहास रचला असल्याचे पाहायला मिळत आहे…….!

Bigg Boss Marathi : छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! बिग बॉस मराठी 5चा नवा विक्रम

‘बिग बॉस मराठी’चं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरांत रात्री 9 च्या ठोक्याला ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन पाहिला जातो. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कार्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’बद्दल चर्चा होताना दिसून येते. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनसोबत नवी पिढी जोडली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube