Oscars Nomination: ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन भरण्यास सुरूवात; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Oscars Nomination 2024 : भारतीय चित्रपट जगतातून महत्वाची बातमी समोर आली आहे. (Oscars) जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुरस्कारासाठी (ऑस्कर पुरस्कार) भारतात नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) च्या कार्यकारी समितीने ही घोषणा केली आहे. (Oscars Nomination) यामध्ये आपला अर्ज भरण्याची 15 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
प्रसिद्ध डम डम डम डम डमरू वाजे गाण्याचं नवरा माझा नवसाचा मध्ये रिक्रिएशन या तारखेला येणार भेटीला
निवडीची प्रक्रिया सुरू
यामध्ये सर्व नोंदींची छाननी आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर, अंतिम प्रवेशाचा निर्णय ज्युरीच्या मताने केला जाणार आहे. तर 27 सप्टेंबर 2024 रोजी त्याची घोषणा कली जाणार आहे. एफएफआयचे अध्यक्ष रवी कोट्टारकारा येत्या काही दिवसांत ज्युरी टीमसह ज्युरी अध्यक्षांच्या नावाची घोषणा करतील. यासोबतच चित्रपट प्रवेशिका छाननी आणि निवडीची प्रक्रिया सुरू होईल.
आम्हाला अभिमान आहे
प्रतिष्ठित ऑस्करसह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतीय चित्रपट आपला ठसा उमटवत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. या वर्षीच्या ऑस्करसाठी भारताचा प्रवेश असणाऱ्या अंतिम चित्रपटाची निवड करणाऱ्या समितीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम आणि जाणकार सर्जनशील जगामधील एक रोमांचक ज्युरी पॅनेल सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत असंही ते म्हणाले आहेत.
Akshay Kumar : अक्षय कुमारसाठी खेल खेल मेंठरणार गेम चेंजर ?
ऑस्करचा इतिहास
ऑस्कर पुरस्काराची संकल्पना मांडण्यात आली, तेव्हा याचं स्वरूप इतकं भव्य-दिव्य नव्हतं. चित्रपट इतिहासकार डेव्हिड थॉमसन यांच्या मते, १९२७ मध्ये मीडिया फर्म मेट्रो-गोल्डविन-मेयरचे प्रमुख लुई बी. मेयर यांनी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ची स्थापना केली. यावेळी हॉलीवूडची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचे आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांना सोपवण्यात आलं होतं. तेव्हाच कला क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्यांचा सन्मान म्हणून ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली.