पहिल्या वहिल्या वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलची दणक्यात सुरुवात!पाहा खास फोटो..
Waterfront Indie Film Festival चा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. यात शॉर्ट फिल्म स्क्रिनिंग, मास्टरक्लासेस आणि पॅनेल डिस्कशन्सचा समावेश असणार

- वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा (WIFF) उद्घाटन सोहळा 2 ऑक्टोबरला अगदी मोठ्या दिमाखात पार असून ज्यामध्ये सिनेरसिक, इंडस्ट्रीतील जाणकार आणि स्वतंत्र फिल्ममेकर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा बघायला मिळालं. या फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म स्क्रिनिंग, मास्टरक्लासेस आणि पॅनेल डिस्कशन्स अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार असून 2 ते 6 ऑक्टोबर 2025 मध्ये हा खास फिल्म फेस्टीवल चित्रपटप्रेमी साठी पर्वणी ठरतोय.
- या फेस्टिवल मध्ये अनेक नवनवीन गोष्टीवर चर्चा होताना बघायला तर मिळतात सोबतीला स्वतंत्र दिग्दर्शक कबीर खुराना यांनी क्युरेट केलेल्या शॉर्ट फिल्म विभागाला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला . या निमित्तानं कबीर खुराना म्हणाले “वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल हे नवोदित प्रतिभांना आपलं काम सादर करण्याचं आणि इंडस्ट्री प्रोफेशनल्सशी संवाद साधण्याचं उत्तम व्यासपीठ आहे” शॉर्ट फिल्म स्क्रिनिंगनंतर प्रेक्षकांनी देखील फिल्ममेकरशी संवाद साधत प्रश्नोत्तरांचा आनंद घेतला
- दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि अभिनेत्री-साहित्यिक सुचित्रा कृष्णमूर्ती यांचा मास्टरक्लास फेस्टिव्हलमधील एक विशेष आकर्षण ठरल. दिग्दर्शक राजेश ‘व्हेंटिलेटर’ लिहायला मला ४८ वर्ष लागली अस सांगत चित्रपटाची मागची खास गोष्ट देखील या निमित्तानं सांगितली.
-
या बद्दल बोलताना दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले “व्हेंटिलेटर हा चित्रपट लिहायला मला ४८ वर्ष लागली हा चित्रपट माझ्या चित्रपट प्रवासातला एक खूप महत्वपूर्ण चित्रपट आहे कारण एका जॉइंट फॅमिली मध्ये राहून हा चित्रपटाची कथा सूचन आणि हा चित्रपट करणं या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खास होत्या. जॉइंट फॅमिली असल्याने घरात कायम अनेक माणस असल्यामुळे लोकांचे निरीक्षण करणे, त्यांच्याशी जुळवून घेणे याची त्यांचा सोबत गप्पा मारणे आणि यातून या चित्रपटाची कथा सुचत गेली आणि तब्बल 48 वर्ष हा चित्रपट लिहिण्यासाठी लागली.
-
माझ्या घराची ही गोष्ट असली तरी यातला प्रत्येक अनुभव या चित्रपटातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला होता आणि यातून “व्हेंटिलेटर” कथानकात उतरला. माझ्यासारख्या आपल्या सगळ्यांचा घरी घडणाऱ्या घटना यातून आम्ही दाखवल्या होत्या आणि 48 वर्षांनी ही कुटुंबा मधली गंमत , त्यांचा भावना या चित्रपटद्वारे आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो. राजेश मापुसकर यांचा नुकताच निर्मिती असलेला “एप्रिल मे ९९” ने देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे आणि येणाऱ्या काळात ते अनेक वैविध्यपूर्ण कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं”
- तर अभिनेत्री गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या यांनी एका वेगळ्या विषयावर चर्चा साधत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं त्या चर्चेत संवाद साधताना म्हणाल्या ” नेपोटिझमवरील वाद हास्यास्पद आहे; आज ही एक लोभी संस्कृती झाली आहे जिथे लोक इतरांच्या कुटुंबीय पार्श्वभूमी किंवा विशेषाधिकारामुळे झालेल्या यशावर चिडतात.”
- या फेस्टिवल मध्ये फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय डहाकेचा मराठी चित्रपट “श्यामची आई ” चे स्क्रिनिंग पार पडलं. सोबतीला सिने रसिकांसाठी खरी पर्वणी ठरली ती म्हणजे दिग्दर्शक हंसल मेहता, तुषार हीरानंदानी, रोहन सिप्पी आणि विशाल फुरिया यांच्यासोबतच पॅनेल डिस्कशन ! ओटीटी, चित्रपट माध्यमावर चर्चा साधून त्यांनी इंडस्ट्रीवरील आपली मतं आणि स्वतंत्र फिल्ममेकरच्या भूमिकेवर विचार यातून प्रेक्षकांसमोर मांडले.WIFF मध्ये अजून कमालीचे कार्यक्रम पार पडणार असून सर्व सिनेप्रेमीनी चुकवू नये असा हा फेस्टिवल आहे.