तुम्ही पाहताय राज्यभरात आज जिल्हा परिषद अन् पंचायत समित्यांचे निकाल हाती आलेत. यामध्ये कोणता पक्ष मोठा अन् कोणता पक्ष लहान ही चर्चा होत राहील, पण राज्यात रंगली ती चर्चा तुम्ही ऐकली का? ईव्हीएम, मतचोरी, पैसे वाटप, बिनविरोध या सगळ्यात आता नवी चर्चा सुरू झाली ती परभणी पॅटर्नची. काय आहे हा पॅटर्न अन् का झाली चर्चा सुरू, पाहुयात…
परभणी पॅटर्नची चर्चा सुरू झाली ती सुरेश वरपुडकर कुटुंबामुळं. राजकारणात पदाची महत्वाकांक्षा असते पण तीला काही मर्यादा? काहीच लगाम नसल्यासारखा हा बेगाम घोडा कुणी आवरायचा अशी चर्चा सरू असतानाच, आज परभणीकरांनी वरपुडकर कुटुंबाचा ‘सगळीकडं आम्हीच’ हा घोडा आवरलाय. सुरेश वरपुडकर हे स्वत: पाथरीचे ५ वेळेस आमदार आणि एकदा जिल्ह्याचे खासदार राहिलेत. काँग्रेसची सत्ता होती तेव्हा स्वत:ला मिरवून घेतलं. अगदी मंत्रीसुद्धा झाले. हे सगळं घडलं ते काँग्रेसमध्ये.
पण, 2014 नंतर काँग्रेस हळूहळू निवडणुकीच्या रिंगणात कमकुवत होत असल्याचं लक्षात येताच वरपुडकरांनी भाजपसारख्या मोठ्या डोहात उडी घेतली. वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे कशाला म्हणतात ते याला. वरपुडकरांनी फक्त स्वत:चे नाही आख्ख्या कुटुंबाचे हात इथं धुवून घ्यायंच ठरवलं होत. पण परभणीकरांनी यांना यावेळी मतपेटीतून पार धुवून काढलंय.
Zilla Parishad Result : अजितदादांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेला उमेदवार झाला विजयी
वरपुडकरांनी जिल्हा परिषदेसाठी कुटुंबात पाच तिकिटं मिळवली. यापैकी तीन भाजप, एक उबाठासेनेचे आणि एक काँग्रेसचे. हे तिकीट मिळवताना आणि भाजपमध्ये जाताना सर्वांचं आवडतं वाक्य अन् ध्येय ते बोललेच होते ‘विकासासाठी हे केलं’. आताही त्यांनी अनेकं तिकीट विकासासाठीच घेतले होते. पण परभणीकरांना इतका अतिरेकी विकास अन् विकासाला वाहून दिलेलं कुटुंब नको होतं. त्यामुळं जनतेने या पाचपैकी चार जणांच्या धुऱ्या वर केल्या आहेत. धुऱ्या वर कळलं का? म्हणजे टांगा पलटी घोडे फरार.
वरपुडकरांची मुलगी सोनल देशमुख (मशाल), चिरंजीव समशेर वरपूडकर (कमळ), सुनबाई प्रेरणा वरपूडकर (कमळ) आणि पुतण्या बोनी वरपुडकर (कमळ) या चौघांना जनतेने विजयी गुलालापासून दूर ठेवलय. पाचवा सदस्य म्हणजे ह्यांचा दुसरा पुतण्या अजित वरपुडकर काँग्रेसकडून बोनीचा पराभव करून जिंकून आला आहे. त्याने नाक राखलं म्हणून दोनचार गोण्या वरपुडकर कुटुंबाने गुलाल उधळायला हरकत नाही.
आमदार आम्हीच, खासदार आम्हीच, मंत्री आम्हीच, जिल्हा परिषदेला आम्हीच, पंचायत समितीला आम्हीच, ग्रामपंचायतीला आम्हीच, सोसायटीला आम्हीच. फक्त वर्गातला मॉनिटर अन् गल्लीला अध्यक्ष वरपुडकरांच्या कुटुंबातला होण बाकी असताना आता परभणीकरांनी सगळ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. या निकालाने राज्यभरात या वरपुडकर कुटुंची चर्चा आहे, अन् हाच आता ‘जगात जर्मनी अन् भारतात परभणी’ असा नवा पॅटर्ण आहे. जो राज्यभारत मतदारांनी राबवावा अशी जोरदार चर्चा आहे. तुम्ही काय म्हणता?… सांगा कॉमेंट करून… आणि हो… लेट्सअपला फॉलो करायला विसरू नका.
