Matthew Perry : ‘फ्रेंड्स’मधील ‘चँडलर बिंग’ची एक्झिट! अभिनेता मॅथ्यू पेरीचं निधन

Matthew Perry Passed Away : सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) निधन झाले आहे. घरातील बाथटबमध्ये तो मृतावस्थेत आढळून आला. सूत्रांच्या हवाल्याने मॅथ्यू पेरीच्या मृत्यूची खात्री करण्यात आली आहे. बाथटबमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फ्रेंड्स या लोकप्रिय वेब सीरिजमध्य […]

फ्रेंड्समधील चँडलर बिंगची एक्झिट, अभिनेता मॅथ्यू पेरीचं निधन

Matthew Perry

Matthew Perry Passed Away : सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) निधन झाले आहे. घरातील बाथटबमध्ये तो मृतावस्थेत आढळून आला. सूत्रांच्या हवाल्याने मॅथ्यू पेरीच्या मृत्यूची खात्री करण्यात आली आहे. बाथटबमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फ्रेंड्स या लोकप्रिय वेब सीरिजमध्य चँडलर बिंगच्या भूमिकेमुळे मॅथ्यू जगभरात ओळखला जात होता. या भूमिकेने त्याला जगभरात ओळख मिळवून दिली होती. दरम्यान, घरातील बाथटबमध्ये मॅथ्यू मृतावस्थेत आढळला मात्र त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट  झालेले नाही.

कोण होता मॅथ्यू पेरी ?

फ्रेंड्स या लोकप्रिय मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता. मॅथ्यू पेरी हा अभिनेत जॉन बेनेट पेरी आणि कॅनडाचे पंतप्रधान पियरे ट्रुडो यांचे एकेकाळचे प्रेस सचिव सुझान मेरी लँगफोर्ड यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 19 ऑगस्ट 1969 रोजी विल्यम्सटाउन येथे झाला. ज्यावेळी तो एक वर्षांचा होता तेव्हा त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. चार्ल्स इन चार्ज या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. परंतु, त्याला खरी प्रसिद्धी टीव्ही सिटकॉम फ्रेंड्समधून. हाच त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. ही मालिका जवळपास दहा वर्षे चालली. या दहा वर्षांच्या काळात मालिकेचे दहा सीझन आले. मे 2004 मध्ये ही मालिका संपली. या मालिकेसह फुल्स रश इन, ऑलमोस्ट हिरोज, द होल इन नाइन याईस, 17 अगेन द रॉन क्लार्क यांसह असंख्य चित्रपटाने त्याने भूमिका केल्या होत्या.

दरम्यान, घरातील बाथटबमध्ये मॅथ्यू मृतावस्थेत आढळला मात्र त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट  झालेले नाही. त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहतेही निराश झाले असून सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहे. मॅथ्यू पेरीच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Animal : लग्नानंतरच्या नौकझौकीची झलक! रणबीर-रश्मिकाच्या अॅनिमलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मॅथ्यू याने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. त्याचं लग्न झालं नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी मॉली हर्विट्ज हिच्यासोबत त्याचा साखरपुडा झाला होता. पण दोघांचं नात फार काळ टिकलं नाही. साखरपुड्यानंतर सहा महिन्यातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर अभिनेत्याचं नाव लिजी कुपलान हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं.

Exit mobile version