Fukrey 3 Trailer: यावेळी फुकरे सिनेमात चूचा, हनी आणि लाली देणार भोली पंजाबनला जोरदार टक्कर. खळखळून हसायला लावणारा ‘फुकरे ३’चा (Fukrey 3) ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मनोरंजनमधील हिट सिनेमाच्या यादीतील एक सिनेमा म्हणजे ‘फुकरे.’ या सिनेमाच्या दोन्ही भागांनी चाहत्यांची चांगलीच मने जिंकली होती. (Trailer Out ) आता या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या भागामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चड्ढा हे मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.
आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर (Social media) याची चांगलीच चर्चा बघायला मिळत आहे. (Hindi Movie)’फुकरे ३’ सिनेमाच्या २ मिनिटे ५१ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात ही अभिनेता पुलकित सम्राट आणि वरुण शर्माने होते. दोघेही एका नगरपालिकेच्या शाळेत फेरवेल पार्टीमध्ये भाषण देत असतात. त्यांचे भाषण ऐकून सर्वांनाच जोरदार हसू अनावर होते.
थोड्या वेळाने अभिनेत्री ऋचा चड्ढा म्हणजे भोली पंजाबनची जोरदार एण्ट्री बघायला मिळाली आहे. तिच्या एण्ट्रीनंतर हंगामा झाल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी ती निवडणूक लढवण्याचे ठरवते. तिच्या विरोधामध्ये तीन फुकरे उतरतात. एकंदरीत सिनेमाचा ट्रेलर बघताना सर्वांनाच हसू अनावर होणार आहे.
TYFC Trailer Out : भूमि पेडणेकरचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज; थॅंक्यू फॉर कमिंगचा ट्रेलर रिलीज
फुकरे सिनेमात भोली पंजाबन तुरुंगात गेली असते. फुकरे रिटर्न्समध्ये ती या तिघांचा बदला घेणार असल्याचे ठरवते. आता फुकरे ३मध्ये ती चूचा, हनी आणि लाली यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे बघायला मिळणार आहे. मृगदीप सिंह लांबा दिग्दर्शित फुकरे ३ हा सिनेमा २८ सप्टेंबर २०२३ दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.