TYFC Trailer Out : भूमि पेडणेकरचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज; थॅंक्यू फॉर कमिंगचा ट्रेलर रिलीज

TYFC Trailer Out : भूमि पेडणेकरचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज; थॅंक्यू फॉर कमिंगचा ट्रेलर रिलीज

TYFC Trailer Out : रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडींग’ चित्रपटानंतर आता ‘थॅंक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा सुरू आहे. तसेच ‘वीरे दी वेडींग’ आणि ‘थॅंक यू फॉर कमिंग’ ची तुलना देखील होत आहे. कारण याही चित्रपटामध्ये पाच अभिनेत्रींची धम्माल पाहायला मिळणार आहे. तशीच ती ‘वीरे दी वेडींग’मध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्करची पाहायाला मिळाली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहचली आहे.

Boys 4: आपण येणार तर धमाका होणार; ‘बॉईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कसा आहे थॅंक्यू फॉर कमिंगचा ट्रेलर?

सोशल मिडीयावर भूमि पेडणेकरच्या थॅंक्यू फॉर कमिंगचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये रोमान्स आणि भरपूर कॉमेडी आहे. यामध्ये भूमि पेडणेकरचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे. त्यात ती मुख्य भूमिकेत असून तिच्या सोबत इतर सहकलाकार आहे.

..अजूनही वेळ गेलेली नाही; अजितदादांच्या आमदारांना रोहित पवारांची साद

दरम्यान या अगोदर या चित्रपटाच्या शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये शहनाज गिल, भूमि पेडणेकर, कुशा कपिला, डॉलि सिंह आणि शिबानी बेदी या पाच अभिनेत्री दिसल्या होत्या. त्यामुळे ही गर्ल गॅंग आता त्यांची कहानी सांगायला सज्ज झाली आहे. तर या पोस्टर आणखी एक गोष्ट चर्चेत आली होती. ती म्हणजे एक अभिनेत्री यामध्ये टॉपलेस होत असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

या चित्रपटात शहनाज गिल, भूमि पेडणेकर, कुशा कपिला, डॉलि सिंह आणि शिबानी बेदी या पाच जणींशिवाय डॉली आहलूवालिया, सुशांत गिवगिर, अनिल कपूर आणि करण कुंद्राही दिसणार आहे. त्यामुळे हा मल्टीस्टारर चित्रपट धुमाकूळ घालणार हे नक्की. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिया कपूरचे पती करण बोलानीने केलं आहे. तर हा चित्रपट 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube