कोण होणार करोडपतीच्या दिवाळी स्पेशल भागात रविना-माधुरीचे मजेशीर किस्से

Kon Honar Crorepati : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, नाती आणि भरपूर धमाल! यंदा हाच उत्साह 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरही अनुभवायला मिळणार आहे.

Kon Honar Crorepati

Kon Honar Crorepati

Kon Honar Crorepati : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, नाती आणि भरपूर धमाल! यंदा हाच उत्साह ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरही अनुभवायला मिळणार आहे. होस्ट माधुरी दीक्षितच्या साथीनं यंदाची दिवाळी अधिक खास करण्यासाठी येत्या सोमवारच्या (९ नोव्हेंबरला) भागात अभिनेत्री रविना टंडन सहभागी होणार आहे.

काही गाणी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहतात. अभिनेत्री रविना टंडनचं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं त्यापैकीच एक! हे गाणं आणि त्या पिवळ्या साडीतला रविना टंडनचा पावसातला दिलखेचक अंदाज आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. मात्र, या पावसातील गाण्यांच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांना विशेषतः महिला कलाकारांना कराव्या लागणाऱ्या कसरतींचा एक रंजक किस्सा रविनानं ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सांगितला.

माधुरी दीक्षितनं रविनाच्या ‘टिप टिप बरसा पानी’ आणि पावसातल्या शुटिंगचा विषय काढला. या गप्पांमध्ये रविनानं सांगितलं की, त्या काळात गाण्यांचं शूटिंग पाच-पाच दिवस चालायचं मात्र ‘टिप टिप बरसा पानी’ अवघ्या तीन दिवसांत पूर्ण झालं. बारा तास शूट चालायचंच. पावसातील शूटिंगदरम्यान गरम पाण्याऐवजी टँकरमध्ये चार-पाच दिवस साठवलेलं पाणी शॉवरमधून यायचं. ते थंड पाणी अचानक अंगावर पडलं की शॉक बसायचा, अशी आठवण तिनं  सांगितली.

राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नका, दिवाळीनंतर डावपेच दाखवून देऊ; आमदार खताळांचा इशारा

यावर माधुरीनंही यात भर घातली. माधुरी म्हणाली, “शॉट संपल्यानंतर संपूर्ण भिजलेल्या अवस्थेत टॉवेल घेऊन कलाकार थंडीनं कुडकुडत बसायचे. हळूहळू शरीरात उब येऊ लागते न लागते , तोच पुन्हा पुढच्या शॉटसाठी बोलावलं जायचं, मग पुन्हा थंड पाणी आणि त्यातच कुडकुडत अभिनय आणि लिपसिंक करावं लागायचं.” दोघींच्या या किस्स्यांनी जुन्या गाण्यांच्या चित्रीकरणामागची मेहनत उलगडली. माधुरी रविनाच्या अशाच गप्पांमधून ‘कोण होणार करोडपती’च्या दिवाळी विशेष भागात जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे. तेव्हा पहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’चा दिवाळी विशेष भाग सोमवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी आणि सोनी लिव वर!

Exit mobile version