FWICE कडून रणवीर सिंगवरील बंदीचा आदेश मागे; रणवीरच्या कायदेशीर नोटीसनंतर घेतला निर्णय

FWICE Ranveer Singh FWICE ने रणवीर सिंगविरोधात जारी केलेले 'नॉन-कोऑपरेशन' निर्देश मागे घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

FWICE Ranveer Singh

FWICE Ranveer Singh

FWICE withdraws ban order on Ranveer Singh; Decision taken after Ranveer’s legal notice : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘डॉन 3’ चित्रपटासंदर्भातील वादांमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून त्याचे नाव वगळल्यानंतर रणवीरला एकामागून एक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) या संघटनेने रणवीर सिंगविरोधात असहकाराची भूमिका घेत त्याच्यावर बंदीसदृश कारवाई जाहीर केली होती.

… तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात, शिंदे – ठाकरेंनी चर्चा करावी; ठाण्यातील बैठकीनंतर नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार ?

या निर्णयानंतर रणवीर सिंगने FWICE ला कायदेशीर नोटीस पाठवल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता या प्रकरणात महत्त्वाचे वळण आले आहे. FWICE ने रणवीर सिंगविरोधात जारी केलेले ‘नॉन-कोऑपरेशन’ निर्देश मागे घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत संघटनेने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आम्हाला मिळालेल्या कायदेशीर नोटिशीला आम्ही कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ. मात्र आजही आम्ही रणवीर सिंगला संवादासाठी आवाहन करत आहोत. त्यांनी आमच्यासोबत बसून हा विषय सौहार्दपूर्ण वातावरणात सोडवावा आणि चित्रपटसृष्टीच्या व्यापक हिताचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करावे.”

भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे पुन्हा चर्चेत; किती आहे त्यांची एकूण संपत्ती?

दरम्यान, FWICE ने आपली भूमिका काहीशी मवाळ करत संवादाचा मार्ग खुला ठेवला आहे. त्यामुळे रणवीर सिंग आणि संघटना यांच्यातील हा वाद चर्चेच्या माध्यमातून मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणावर रणवीर सिंगकडून काय प्रतिक्रिया येते आणि पुढील घडामोडी काय घडतात, याकडे बॉलिवूडसह चाहत्यांचेही लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘डॉन 3’मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह यांच्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने बंदी घातली होती. फरहान अख्तर यांच्या ‘डॉन 3’ चित्रपटातून रणवीर यांनी अचानक माघार घेतल्याच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. जोपर्यंत ‘डॉन 3’ वाद मिटत नाही, तोपर्यंत संघटनेच्या सदस्यांना त्यांच्यासोबत काम न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर मोठा खर्च झाल्यामुळे सुमारे 45 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केल्याचं सांगितलं जात होत.

हा वाद एप्रिलमध्ये एक्सेल एन्टरटेन्मेंट यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सुरू झाला. रणवीर यांनी तीन चित्रपटांचा करार केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्यांनी प्रकल्प सोडल्याने निर्मात्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागल्याचं म्हटलं जात आहे. FWICE ने या प्रकाराला हिंदी चित्रपटसृष्टीसाठी गंभीर मुद्दा म्हटलं आहे. शूटिंग सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधी कलाकारांनी चित्रपट सोडल्यामुळे निर्माते, तंत्रज्ञ आणि शेकडो कामगारांचे नुकसान होत असल्याचं संघटनेचं मत आहे.

देशात पहिल्यांदाच लाँच होणार ‘टेंपल बॉन्ड्स’…, मंदिरातून दरमहिन्याला कमाईची संधी

FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. “शूटिंगच्या दहा दिवस आधी प्रोजेक्ट सोडणं चुकीचं आहे. उद्योगाचं नुकसान होऊ देणार नाही,” असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, फरहान अख्तर यांनीही चित्रपटाबाबतची अनिश्चितता मान्य केली आहे. ‘डॉन 3’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. याआधी 2011 मध्ये आलेल्या ‘डॉन 2’मध्ये शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा प्रमुख भूमिकेत होते.

 

Exit mobile version