Download App

Gadar 2 ची सातव्या दिवशी बम्पर कमाई; 300 कोटींचा पल्ला लवकरच गाठणार

Gadar 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर 2’ (Gadar 2) हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही वर्षांपासून चाहते प्रतीक्षा करत असलेला हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याने हा चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांची पाऊले आता चित्रपटगृहाकडे वळत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा महत्वाच्या भूमिकेत दिसून आले आहेत.

धक्कादायक! मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर बिबट्याचा हल्ला, नगरमध्ये खळबळ

या सिनेमाने ‘तू झूठी मैं मक्कार, रॉकी और रानी की प्रेम कहानी, आदिपुरुष, किसी का भाई किसी की जान या सर्व सिनेमाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’ हा सिनेमा 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने अद्याप पठाणचा रेकॉर्ड मोडला नाही. परंतु सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. तर आज आपण सातव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत.

Talathi Bharti परिक्षेत गैरप्रकार; नाशिकमध्ये एक ताब्यात, मोठ्या रॅकेटची शक्यता

सनी देओलच्या ‘गदर २’ सिनेमाने 6 दिवसात 261.35 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. आता 7 व्या दिवशी देखील सिनेमा मोठ्या प्रमाणात कमाई करत असल्याचे दिसत आहे. सहाव्या दिवशी सिनेमाने 23.28 कोटी रुपयांची मोठी कमाई केल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे सिनेमाने एकूण 284.63 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पहिल्या दिवशी- 40.10 कोटी, दुसऱ्या दिवशी- 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी- 51.07 कोटी, चौथ्या दिवशी- 38.70 कोटी, पाचवा दिवशी- 55.40 कोटी सहावा दिवशी- 32.37 तर सातव्या दिवशी 23.28 कोटींची कमाई केली आहे. ‘गदर : एक प्रेम कथा’ हा सिनेमा 2001 साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानचा ‘लगान’ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ‘गदर’ आणि ‘लगान’ हे दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी देखील ‘गदर २’, ‘जेलर’ आणि ‘ओएमजी २’ हे सिनेमे आमने- सामने असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us