Talathi Bharti परिक्षेत गैरप्रकार; नाशिकमध्ये एक ताब्यात, मोठ्या रॅकेटची शक्यता

Talathi Bharti परिक्षेत गैरप्रकार; नाशिकमध्ये एक ताब्यात, मोठ्या रॅकेटची शक्यता

Talathi Bharti Exam 2023 : राज्यात गेल्या काही महिन्यात अनेक पदांच्या भरती परिक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे. त्यात आता तलाठी भरतीच्या ऑनलाईन परिक्षेमध्ये देखील असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. गुरूवारी राज्यात होणाऱ्या तलाठी भारतीसाठीच्या ऑनलाईन परिक्षेच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यात विविध ठिकाणी परिक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे.

राजू शेट्टींना शरद पवारांचा भरवसाच नाही; म्हणाले, मला त्यांच्याबाबत..

या दरम्यान नाशिकमध्ये म्हसरूळ परिसरातील केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या परिक्षा केंद्राबाहेर दोन व्यक्ती संशयास्पद रित्या वावरत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यात केंद्राबाहेरून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याच्या करून गैरप्रकार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात दोन मोबाईल, टॅब, हेडफोनसह वॉकी टॉकीचा देखील समावेश आहे. या माध्यामातून या तरूणाने एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळल्याने खळबळ उडाली आहे.

जेष्ठ तमाशा कलावंत शांताबाईंना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित

या प्रकरणी पुढील चौकशी सुरू झाली आहे. तर म्हसरूळ पोलीस ठाण्यात यासंदर्बात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ परिसरातील केंद्राबाहेरून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या प्रकणात मोठं रॅकेट असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा संशयित तरूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे.

नाशिकमध्ये शैक्षणिक गैरप्रकार वाढले…

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे गैरप्रकार होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाने एका महिला शिक्षणाधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली होती. त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये देखील बोगस भरतीचा प्रकार समोर आला होता. त्यात आता तलाठी भारतीसाठीच्या ऑनलाईन परिक्षेच्या पहिल्या टप्प्यात पहिल्याच दिवशी हा गैरप्रकार समोर आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube