जेष्ठ तमाशा कलावंत शांताबाईंना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित

जेष्ठ तमाशा कलावंत शांताबाईंना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित

Shantabai Londhe-kopargaonkar : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‌ हस्ते पाच लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले. मागील काही दिवसांपासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या वृत्ताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांताबाईंचे पुनर्वसन करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.

Sharad Pawar झोपेतही ईडी म्हटल्यावर 1 किलोमीटर धावतात; मुनगंटीवारांची टीका

मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतीच तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांची द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन योजने अंतर्गत सन- 2009 पासून त्यांना वर्ग ‘क’ कलाकार म्हणून दर महिन्याला 2250 रुपये मानधनही शांताबाईंना देण्यात येत आहे.

नागपूरकरांना गुडन्यूज! सीएनजीच्या दरात मोठी घसरण; आता ‘इतक्या’ रुपयांत मिळतंय इंधन

सध्या शांताबाई शिर्डी येथील द्वारकामाई वृध्दाश्रमात राहत आहेत. शांताबाई लोंढे सध्या त्यांचे भाचे कोंडीराम मार्तंड लोंढे व राजू मार्तंड लोंढे यांच्या समवेत गजानन नगर, कोपरगाव येथे राहात होत्या. ते त्यांची सांभाळ करीत आहेत. परंतु वार्धक्य व त्यांची मानसिक अवस्था वेळोवेळी विचलीत होत असल्याने ते बऱ्याच वेळा घराच्या बाहेर राहात असल्याची माहिती त्यांच्या नातलगांनी दिली. यापुढे त्या द्वारकामाई वृद्धाश्रम येथेच निवास करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे शांताबाईंना तात्काळ पाच लाखांची मदत मिळाली आहे. शासन मदतीबद्दल शांताबाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे‌‌त.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube