Gadar2 Controversary: अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा बहुप्रतक्षित ‘गदर 2’ (Gadar2) या सिनेमाचे सध्या शुटींग सुरू आहे. कलाकार सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share)करत असतात. सिनेमासाठी चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सनी देओल आणि अमीष पटेल यांची व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. या व्हिडीओने आता वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सनी आणि अमीषा गुरूद्वारात (Gurdwara) रोमँटिक सीन (Romantic scene) करत असल्याचे दिसून येत आहे.
SGPC has raised strong objection to the shooting of a scene of Sunny Deol starrer "#Gadar2" on the premises of a gurdwara which surfaced online, Sunny Deol and Ameesha Patel can be seen standing arm in arm and looking at each other at the gurdwara pic.twitter.com/WDJpHI7guo
— Gagandeep Singh (@Gagan4344) June 8, 2023
हा व्हिडीओ सिनेमा रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याचे दिसून येत आहे. शिरमणि गुरूद्वारा प्रबंधक कमिटीने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत विरोध केला आहे. त्याचप्रमाणे जीपीसी जनरल सेक्रेटरी गुरूचरण सिंह ग्रेवाल यांनी सनी देओल आणि अमीष पटेल यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. जीपीसीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे, आणि कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच जोरदार व्हायरल होत आहे, हे रिलीजच्या अगोदरच सिनेमा मोठ्या वादाच्या भवऱ्यात सापडल्याचा दिसत आहे. गुरूद्वारेत झालेल्या या प्रकारानंतर गदर 2चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी स्पष्टीकरण देत पोस्ट देखील लिहिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितले आहे की, गदर 2 सिनेमाच्या लीक झालेल्या फुटेजविषयी मला सांगायचे आहे की, नुकताच एका गुरूद्वाकाच्या बाहेरील प्रांगणात एक सीन शुट झाला. मी सर्वांना सांगू इच्छितो की, माझ्या संपूर्ण टीमला आणि धार्मिक भावनांचा अत्यंत आदर आहे. आणि आम्ही त्याचे पावित्र्य राखवण्यासाठी वचनबद्ध आहोत.
Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…
मी अगोदर ही एक सिनेमा केला आहे. त्यावेळी या गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत आणि भविष्यात देखील याची नक्कीच काळजी घेणार आहोत, याची खात्री देत आहे. तसेच अनील शर्मा यांनी पुढे लिहिले आहे की, मी हे देखील स्पष्ट करू इच्छितो कॅप्चर करण्यात आलेलं फुटेज एका पर्सनल फोनवर करण्यात आले आहे. सिनेमामध्ये तो सीन तसा शुट करण्यात आला नाही. माझ्या कामामुळे कळत नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यासाठी मी मनापासून माफी मागत आहे. कोणाच्या भावना दुखावणं किंवा अनादर करण्याचा आमचा आजिबात हेतू नव्हता. माझ्याकडून झालेल्या या चुकीमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मला त्याचा खेद वाटत आहे.
Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…
आम्ही सर्व नियम आणि मार्गदर्शन तत्त्वांचे अतिशय काटेकोरपणे पालन करत आहोत, जेणेकरून आमच्या कामाची जबाबदारीने आणि आदरपूर्वक केलं जाणार आहे. शुटींगच्या दरम्यान गुरूद्वारा समितीने दिलेल्या पाठिब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानत इच्छितो. गदर 2 मुळे कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत,असे मी सांगू इच्छितो, असंही अनील शर्मा यावेळी म्हणाले आहेत.