Download App

Gadar 2 च्या निर्मात्यांनी दिलं चाहत्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट!

Gadar 2 : ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाला सनी पाजीचे चाहते सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर 2’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. चित्रपट दमदार कमाई देखील करत आहे. यामध्येच आता निर्मात्यांनी रक्षाबंधनिमित्त चाहत्यांना एक गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला ऑफरमध्ये हा चित्रपट पहायला मिळणार आहे.

मनातला मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी एकदाचं सांगूनच टाकलं…

काय आहे ‘गदर 2’ रक्षाबंधनचं गिफ्ट?

रक्षाबंधन (Rakha Bandhan) या सणाला संपूर्ण भारत भरात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आज सर्वत्र भावा-बहिणीच्या या सणासाठी लगबग पाहायाला मिळत आहे. उत्साहाचे वातावरण आहे. त्यात ‘गदर 2’ च्या निर्मात्यांनी चाहत्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट दिलं आहे. ते म्हणजे दोन तिकीटं खरेदी केल्यावर दोन तिकीटं मोफत देणार आहेत. ही ऑफर काल 29 ऑगस्टपासून ते 3 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

BJP कडून पंतप्रधान मोदींचा ‘टर्मिनेटर’ असा उल्लेख, पोस्टर शेअर करून इंडिया आघाडीवर टीका

त्यासाठी प्रेक्षकांना Promo Code Gadar 2 वापरायचा आहे. तसेच ज्या अॅपवरून तुम्ही तिकीटं बुक करत आहात त्यावर देखील तुम्हाला Unlock offer किंवा Apply Promo code हा पर्याय असणार आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला GADAR2 टाइप करायचं आहे. म्हणजे तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकणार आहात.

चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल, अमिषा पटेल यांच्याशिवाय उत्कर्ष शर्मा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर’ हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘गदर 2’ (Gadar 2)चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

त्याचबरोबर सनी पाजीच्या ‘गदर 2’ हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘माँ तुझे सलाम 2’ या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘माँ तुझे सलाम 2’ हा सिनेमा देखील लवकरच ५०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप या सिनेमाबद्दल अधिक माहिती समोर आली नाही. आता ‘गदर 2’ सिनेमाला मिळालेलं यश लक्षात घेत ‘माँ तुझे सलाम’चा सीक्वेल प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्याचं सांगितले जात आहे. महेंद्र धारीवाल या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं पोस्टरमध्ये दिसून आले आहे.

Tags

follow us