Download App

Box Collection: ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; सहाव्या दिवशीही जमवला मोठा गल्ला

Gadar 2 Box Office Collection: सध्या बॉलिवूड अभिनेता सनी पाजीचा (Sunny Deol) ‘गदर २’ हा सिनेमा जोरदार चर्चेत आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाने तर आता २०२३ या वर्षातील कमाईच्या बाबत अनेक रेकॉर्ड तोडल्याचे बघायला मिळत आहे.


या सिनेमाने ‘तू झूठी मैं मक्कार, रॉकी और रानी की प्रेम कहानी, आदिपुरुष, किसी का भाई किसी की जान या सर्व सिनेमाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर २’ हा सिनेमा २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने अद्याप पठाणचा रेकॉर्ड मोडला नाही. परंतु  सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. तर आज आपण सहाव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत.

सनी पाजीच्या ‘गदर २’ सिनेमाने ५ दिवसात २२८.९८ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. आता ६ दिवशी देखील सिनेमा मोठ्या प्रमाणात कमाई करत असल्याचे दिसत आहे. सहाव्या दिवशी सिनेमाने ३४.५० कोटी रुपयांची मोठी कमाई केल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे सिनेमाने एकूण २६३.४८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Box Office Collection: १५ ऑगस्टला चाहत्यांची तुडुंब गर्दी; बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’ची हवा!

पहिल्या दिवशी- ४०.१ कोटी, दुसऱ्या दिवशी- ४३.०८ कोटी, तिसऱ्या दिवशी- ५१.७ कोटी, चौथ्या दिवशी- ३९ कोटी, पाचवा दिवशी- ५५.५ कोटी तर सहावा दिवशी- ३४.५० कोटींची कमाई केली आहे.  ‘गदर : एक प्रेम कथा’ हा सिनेमा २००१ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानचा ‘लगान’ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ‘गदर’ आणि ‘लगान’ हे दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी देखील ‘गदर २’, ‘जेलर’ आणि ‘ओएमजी २’ हे सिनेमे आमने- सामने असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us