Box Office Collection: १५ ऑगस्टला चाहत्यांची तुडुंब गर्दी; बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’ची हवा!

Box Office Collection: १५ ऑगस्टला चाहत्यांची तुडुंब गर्दी; बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’ची हवा!

Jailer Box Office Collection : १५ ऑगस्टला चाहत्यांनी ‘जेलर’ हा सिनेमा बघण्यासाठी तुडुंब गर्दी केली आहे. आता सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. देशातील मनोरंजनसृष्टीसाठी १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक वर्षी खास ठरत असतो. या दिवशी प्रदर्शित होणारे सिनेमा बॉक्स ऑफिसवर ( Box Office Collection) तुफान कमाई करत असल्याचे बघायला मिळत असते.

यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांतचा (Rajinikanth) ‘जेलर’ हा सिनेमा स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर रिलीज करण्यात आला आहे. परंतु १५ ऑगस्टला या सिनेमाला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे बघायला मिळाले आहे. थलायवाचा ‘जेलर’ हा सिनेमा गुरुवारी १० ऑगस्ट दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. तब्बल २ वर्षांनंतर थलायवा आता मोठ्या पडद्यावर आला  आहे. पहिल्या दिवशीच या सिनेमाने कमाईविषयी एक अनोखा रेकॉर्ड केल्याचे बघायला मिळाले आहे. सिनेमाने ५२ कोटी रुपयांची सर्वात मोठी कमाई केली आहे.

यानंतर आता १५ ऑगस्ट दिवशी सिनेमाने ३३ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. आतापर्यंत या सिनेमाने देशात २०७.१५ कोटी रुपयांचा मोठा गल्ला कमावला आहे. तर जगभरात सिनेमाने २३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता ते जेलर सिनेमा बघण्यासाठी थेट चेन्नई गाठले आहेत. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, जेलर सिनेमाने पहिल्या दिवशी ५० कोटीहून मोठी कमाई केली आहे ‘जेलर’ या सिनेमात रजनीकांत मुथुवेल पांडियन, एका सामान्य कुटुंबाभिमुख पुरुषाची भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळाले आहे.

Manisha Koirala Birthday: मनिषा कोयरालाची मराठी अभिनेत्यासोबतची जुनी Love Story माहिती आहे का?

तसेच त्यांच्यावर संकट येऊ लागतात, त्यावेळेस ते त्यांचा सामना कोणत्या पद्धतीने करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाची कथा चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत. ‘जेलर’ सिनेमाच्या प्रदर्शितच्या दिवशी बंगळूरू आणि चेन्नईसह अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच एक जपानी जोडपे ओसारावरुन चेन्नईला आले होते. त्यांनी चक्क तामिळमध्ये संवाद साधला आणि सिनेमा पाहिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube