Download App

Mahatma Vs Gandhi: राष्ट्रपित्याच्या भूमिकेसाठी बोमन इरानींनी घटवलं ३० किलो वजन’

Boman Irani insta post : देशात दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींनी (Gandhi Jayanti) महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात कोणत्याही व्यक्तीला महात्मा गांधींची ओळख पटवून देण्याची गरज नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गांधीजींवर आधारित एका नाटकात मुख्य भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने ३० किलो वजन कमी केल्याचे यावेळी सांगितले आहे.


तसेच मनोरंजन क्षेत्रातील देखील काही सेलिब्रेटी गांधी जयंतीच्या निमित्तानं सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचे बघायला मिळत आहे. या सर्वात एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. त्यामध्ये त्यानं आपण गांधीजींवर आधारित एका नाटकात मुख्य भूमिका साकारण्यासाठी एक नाही दोन नाहीतर तब्बल ३० किलो वजन कमी केल्याचे यावेळी अभिनेत्याने सांगितले आहे. त्यांची ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

परंतु अनेकांना ते अभिनेते नेमके कोण आहेत हे ओळखता आले नसल्याचे देखील बघायला मिळत आहे. अभिनेत्यानं स्वत: त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानं अनेकांना त्यांचे नाव समजले आहे. याअगोदर मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्यांनी महात्मा गांधीजींच्या भूमिका साकारली आहे. त्यामध्ये दिलीप प्रभावळकर, रजीत कपूर, नसिरुद्दीन शहा, दर्शन जरीवाला यांची नावं तर घ्यावीच लागणार आहेत. तसेच आणखी एका अभिनेत्यानं गांधींवरील एका नाटकासाठी त्यांची भूमिका साकारण्याचा असल्याचा निर्णय हाती घेतला आहे.

‘लुझर के साथ कोई नही टिकता’; ’12 th Fail’ चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

त्यासाठी त्यानं चक्क तीस किलो वजन कमी केलं. असे त्यानेच भाष्य केल्याचे पोस्टमध्ये बघायला मिळत आहे. परंतु तर अभिनेते दुसरे तिसरे कुणी नाही, तर सुप्रसिद्ध अभिनेते बोमण इराणी हे आहेत. त्यांच्या त्या फोटोंनी अनेकांना चक्रावून सोडले आहे. तसेच अनेकांना या पोस्टवर विश्वास देखील बसत नाहीय, ते बोमण इराणी आहेत, त्यांनीच पोस्ट शेयर करुन गांधींबद्दल असलेली भावना व्यक्त केल्याचे बघायला मिळत आहे .

Tags

follow us