Download App

Gandhi Talks करणार यंदाचा इफ्फी चित्रपट महोत्सव खास; जाणून घ्या चित्रपटाची खासियत

  • Written By: Last Updated:

Gandhi Talks : 20 ते 28 नोव्हेंबरला गोव्यामध्ये मानाचा इफ्फी (IFFI) चित्रपट महोत्सव भरणार आहे. आता तुम्ही म्हणालं हा चित्रपट महोत्सव तर दरवर्षी भरतो. यावेळी खास काय? तर ऐका यावेळचा इफ्फी (IFFI) महोत्सव खास करणार आहे. एक आगळावेगळा चित्रपट ज्यामध्ये ना भाषा असणार आहेॉ ना संवाद असणार आहेत. कोणता आहे हा चित्रपट याची खासियत काय जाणून घेऊ सविस्तर…

Ahmadnagar Politics: दिवाळी फराळाला निवडणुकीचा ‘वास’

खरंतर या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या निमित्ताने रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली कारण हा एक मूकपट असणार आहे. मराठी असलेल्या किशोर बेळेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती यांच्यासह अदितीराव हैदरी, सिद्धार्थ जाधव, अरविंद स्वामी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. तर चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिलं आहे. हा चित्रपट मूकपटासह एक लघुपट देखील असणार आहे.

भाजपच्या महिला खासदाराचा विवाह वादात, एका युवकाने केला पती असल्याचा दावा

दरम्यान या चित्रपटाच्या नावाप्रमाणे आणि टीझरवरून या चित्रपटाबद्दल सांगायच झाल्यास हा चित्रपट महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित आहे. ज्यामध्ये प्रचंड पैसा दाखवण्यात आला आहे. तसेच गांधींचा वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका हे संदेश देणारे माकडं दाखवण्यात आले आहे. जे चित्रपटातील कलाकार आपल्या हावभावातून देखील सांगत आहेत. तर चित्रपटाचा नायक विजय सेतुपती यामध्ये कोणता ट्विस्ट आणणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण तो एक चौथ माकडं यामध्ये दाखवत जे आहे जे ड्रम वाजवताना दाखवण्यात आलं आहे.

महात्मा गांधींच्या संदेशामध्ये आणखी काय भर घालण्यात आली आहे. तसेच चित्रपटामध्ये प्रेक्षकांना नेमका काय संदेश दिला जाणार आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स नेमका कसा असणार आहे. याची उकत्सुकता अद्याप कायम आहे. मात्र यंदाच्या इफ्फी म्हणजेच गोव्यात भरणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियामध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे.

Tags

follow us