Download App

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अखेर गौरव मोरेची एक्झिट; म्हणाला, ‘हे सांगता खूप वाईट वाटतंय…’

Gaurav More: गौरवनं इन्स्टाग्रामवर हास्यजत्रेच्या स्टेजचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

Gaurav More Emotional Post: सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ (Maharashtrachi Hasya Jatra ) या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यापैकी एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. (Gaurav More ) आपल्या विनोदी शैलीमुळे फिल्टरपाड्याचा बच्चन अल्पावधीतच प्रसिद्धीझोतात आला. आपल्या विनोदबुद्धीने तो अनेकांना पोट धरून हसायला भाग पाडतो. अखेर आता गौरवने हास्यजत्रा शो सोडल्याचं जाहीर केलं आहे. त्याने सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.


गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Gaurav More Emotional Post) सेटचा शेवटचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलंय की, “Hello everyone i am a gaurav more from powai filter pada Ta na na na na naaaaaa आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची…… रसिक प्रेक्षक आपण ह्या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत..”

गौरव मोरे पुढे लिहिले आहे की, “मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे.

माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे.”

Jeena Sikha De: अरिजितच्या जादुई आवाजात सजलंय ‘जीना सिख दे’! ‘श्रीकांत’ मधील गाणं ऐकाच

गौरवनं हास्यजत्रा सोडल्याचं जाहीर केल्यानंतर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया त्याला येत आहेत. त्याच्या काही चाहत्यांनी यावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी त्याला नव्या शोसाठी आणि नव्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, “एक नंबर बच्ची. आता तर पवई फिल्टरपाडा सगळ्या जगाला कळेल”. तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, “गौरव मोरे दादा आता मार्कट खाणार. आता तिकडे पण आग लावणार”, अशा कॉमेंट्स सध्या त्याच्या पोस्टला मिळत आहेत.

follow us